Join us

चेहरा धुण्यासाठी केमिकल्सयुक्त फेसवॉशपेक्षा वापरा 'हे' ६ पदार्थ, त्वचेला मिळतील अनेक फायदे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2025 18:23 IST

1 / 7
चेहऱ्याच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण स्किन रुटीनसोबत (How To Wash Your Face Without Soap & Face Wash) दिवसातून किमान ३ वेळा तरी फेसवॉश (6 Ways to Wash Your Face Without Soap & Face Wash) करतो. फेसवॉश करण्यासाठी प्रत्येकजणी आपल्या त्वचेला (Try These Home Remedies For Skin Care & Face Wash) सूट होईल असा फेसवॉश वापरतात. परंतु हे केमिकल्सयुक्त फेसवॉश वापरण्यापेक्षा आपण किचनमधील काही नैसर्गिक पदार्थांचा वापर करून देखील फेसवॉश करु शकतो. हे पदार्थ नेमके कोणते ते पाहूयात.
2 / 7
त्वचेसाठी दही अत्यंत फायदेशीर मानले जाते. यामध्ये असलेले लॅक्टिक ॲसिड त्वचेला एक्सफोलिएट करते, त्वचेच्या मृत पेशी काढून टाकते आणि त्वचा मऊ करते. दह्यामध्ये असलेले झिंक त्वचेतील तेल उत्पादन नियंत्रित करते आणि मुरुमांशी लढण्यास मदत करते. यामुळे आपण फेसवॉश करण्यासाठी दह्याचा वापर करु शकता.
3 / 7
मधामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात जे त्वचेला संसर्गापासून वाचवतात आणि तिचे पोषण करतात. मध त्वचेला मॉइश्चरायझ करते आणि मऊ बनवते. तुम्ही मध थेट चेहऱ्यावर लावू शकता किंवा इतर घटक मिसळून फेसपॅक बनवू शकता. अशाप्रकारे चेहऱ्याच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण मधाचा वापर करु शकता.
4 / 7
बेसनमध्ये व्हिटॅमिन 'बी' आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात, ज्यामुळे त्वचेचे पोषण केले जाऊन लूज पडलेल्या त्वचेला टाईटपण येतो. बेसन त्वचेला एक्सफोलिएट करते, त्वचेच्या मृत पेशी काढून टाकते आणि त्वचा मऊ करते. बेसनाचा फेसपॅक बनवण्यासाठी तुम्ही त्यात दही, हळद किंवा लिंबाचा रस मिसळून त्वचेला लावू शकता.
5 / 7
मुलतानी माती त्वचेसाठी एक नैसर्गिक क्लींजर म्हणून काम करते. मुलतानी माती त्वचेतील अतिरिक्त तेल आणि घाण शोषून घेते आणि त्वचेची छिद्र स्वच्छ करते. मुलतानी माती त्वचेला होणारा दाह शांत करते आणि जळजळ कमी करते. मुलतानी मातीचा फेसपॅक बनवण्यासाठी तुम्ही त्यात गुलाबपाणी किंवा दही मिसळू शकता.
6 / 7
टोमॅटोमध्ये 'लाइकोपीन' असते जे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण करते. टोमॅटोमध्ये असलेले व्हिटॅमिन 'सी' त्वचेला कोलेजन उत्पादनात मदत करते, ज्यामुळे त्वचा टाईट होते आणि यंग दिसते. टोमॅटोचा रस चेहऱ्यावर लावल्याने काळे डाग कमी होतात आणि त्वचेचा रंग सुधारतो.
7 / 7
कच्च्या दुधाचा वापर चेहऱ्यावर क्लिंझर म्हणून केले जाते. यामुळे चेहरा क्लिन होतो, यासह स्किनवर नैसर्गिक ग्लो येतो. यासाठी एका वाटीत दूध घ्या, त्यात कापूस बुडवून दूध चेहऱ्यावर लावा. दुधाचा कापूस चेहऱ्यावर चोळल्याने त्वचेतील घाण आणि डेड स्किन निघून जाईल. यानंतर पाण्याने चेहरा क्लिन करा.
टॅग्स : ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी