1 / 5चिंचेचा उपयोग वेगवेगळ्या पदार्थांमध्ये कसा करायचा हे आपल्याला माहितीच आहे. चिंच लावून तांबे- पितळाची भांडी घासली तर ती अगदी चकाचक होतात हे देखील आपल्याला माहिती आहे.2 / 5आता त्याच चिंचेचा वापर करून चेहऱ्यावरचे पिगमेंटेशन कसे कमी करायचे ते पाहुया. पिगमेंटेशन कमी करून त्वचेवर छान ग्लो आणण्यासाठी चिंच अतिशय उपयुक्त ठरते.3 / 5यासाठी सगळ्यात आधी थोडीशी चिंच २ ते ३ तासांसाठी पाण्यात भिजवून ठेवा.आता भिजलेल्या चिंचेचा कोळ काढून घ्या. त्यात अर्धा चमचा दही घाला..4 / 5तसेच अर्धा चमचा मध घाला. मध आणि दही यामुळे तुमच्या त्वचेत आणखीनच छान बदल दिसून येईल. 5 / 5आता हा लेप चेहऱ्याला लावा आणि १५ मिनिटांनी चेहरा धुवून टाका. चेहरा धुतल्यानंतर मॉईश्चराईज करा. हा उपाय महिन्यातून ७ ते ८ वेळा केल्यास पिगमेंटेशन कमी होतात, असं mansifaceyoga या इंस्टाग्राम पेजवर सांगितलं आहे.