By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 19:01 IST
1 / 6Onion Peel for hair : कांदा तर प्रत्येक घरात असतोच असतो. कारण कांद्याशिवाय बरेच पदार्थ केलेच जाऊ शकत नाहीत. सामान्यपणे कांदा वापरून कांद्याची साल कचरा समजून फेकली जाते. पण अनेकांना याचे फायदेच माहीत नाहीत. तुम्हाला माहीत नाही, पण कांद्याची साल केसांसाठी वरदान ठरू शकते. अशात केसांसाठी कांद्याची साल कशी वापरावी आणि त्याचे फायदे काय हे माहीत असणं महत्वाचं ठरतं. कांद्याच्या सालीच्या मदतीनं तुम्ही हेअर टोन तयार करू शकता. ज्यानं केसांची वाढ होईल, केसगळती थांबेल, केस मजबूत होतील, दाट होतील आणि लांबही होतील. 2 / 6तुम्ही जी कांद्याची साल कचरा समजून फेकता, त्यात भरपूर प्रमाणात सल्फर, व्हिटामिन ए, सी आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात. या तत्वांनी केसांची मूळं मजबूत होतात. त्यामुळे तुटण्याची समस्या दूर होते. 3 / 6आता तुम्हाला कांद्याच्या सालीचे फायदे समजले असतील तर यापासून हेअर टोनर कसं बनवायचं ते पाहू. कांद्याच्या सालीचं हेअर टोनर बनवण्यासाठी २ वाटी कांद्याची साल, ४ ग्लास पामी, ३ चमचे मेथीच्या बिया, २ चमचे तांदूळ आणि २ जास्वंदाची फुलं हवीत.4 / 6नंतर एक कढई घ्या आणि त्यात पाणी टाकून वरील सगळ्या गोष्टीही टाका. या गोष्टी २० मिनिटं शिजवा. पाण्याचा रंग बदललेला तुम्हाला दिसेल. २० मिनिटांनी गॅस बंद करा आणि पाणी थंड होऊ द्या. कांद्याच्या सालीचं हेअर टोनर तयार आहे.5 / 6हे तयार झालेलं हेअर टोनर गाळून एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा आणि हे टोनर तुम्ही रोज आंघोळीच्या एक तास आधी किंवा रात्री झोपण्याआधी केसांवर लावा. डोक्याच्या त्वचेसोबतच केसांना टोनर चांगलं लावा. रोज याचा वापर कराल तर केस मजबूत, सुंदर, मुलायम, दाट होतील.6 / 6कांद्याच्या सालीच्या हेअर टोनरमध्ये मेथीच्या बियांचा वापर करण्यात आला आहे. ज्यातील प्रोटीन केस वाढीसाठी मदत करतं. यात तांदळाचा वापर केस चमकदार करण्यासाठी केला आहे. तेच जास्वंदाच्या फुलांचा वापर केसांना कंडिशन करण्यासाठी आणि ते हेल्दी ठेवण्यासाठी केला गेला आहे.