1 / 8त्वचेसाठी, केसांसाठी कोरफडीचा गर अतिशय उत्तम असतो, हे आपल्याला माहितीच आहे. पण त्याचा वापर नेमका कसा करावा ते समजत नाही. म्हणूनच या काही टिप्स..2 / 8पुढे सांगितलेल्या वेगवेगळ्या पद्धतीनुसार तुम्ही कोरफड वापरली तर केस, त्वचा निरोगी ठेवण्यासाठी इतर कोणतेच कॉस्मेटिक्स वापरण्याची गरज पडणार नाही.3 / 8जर भुवया पातळ असतील तर कोरफडीच्या पानांमधला ताजा गर आयब्रो ब्रशवर लावा आणि तो भुवयांवर फिरवून मसाज करा. भुवया दाट होतील.4 / 8कोरफडीचे पान मधोमध कापा आणि त्यावर थोडी हळद टाका. आता हा तुकडा काखेत फिरवा. ज्या लोकांना खूप घाम येतो, काखेमध्ये काळेपणा आलेला असेल किंवा अंगाला नेहमीच घामाची खूप दुर्गंधी येत असेल तर ती या उपायामुळे कमी होऊ शकते.5 / 8कोरफड वाळवून घ्या आणि त्याची पावडर करा. आता ही पावडर टुथब्रशला लावून त्याने ब्रश करा. हा उपाय केल्यामुळे दातांचा पिवळेपणा कमी होतो. तसेच हिरड्याही मजबूत होतात.6 / 8खोबरेल तेलामध्ये कोरफडीचा गर घालून ते उकळून घ्या. हे तेल केसांना लावा आणि अर्ध्या तासाने केस धुवून टाका. केसांचा कोरडेपणा जाऊन ते मऊ, सिल्की आणि चमकदार होतात.7 / 8कोरफडीचा गर लिपस्टिकच्या रिकाम्या बाटलीमध्ये घाला आणि फ्रिजमध्ये ठेवून तो घट्ट करून घ्या. आता ही स्टिक दररोज डोळ्यांभोवती फिरवा. डार्क सर्कल्स कमी होतील.8 / 8कोरफडीचं पान मधोमध कापा. त्यावर थोडी साखर आणि थोडी कॉफी पावडर घाला. आता हे पान तुमच्या चेहऱ्यावर चोळा. यामुळे टॅनिंग, डेडस्किन जाऊन त्वचा चमकदार होते.