घरकाम करून हात खरखरीत झाले- काळवंडून गेले? फक्त १० मिनिटांचा उपाय- हात होतील मऊ
Updated:July 30, 2025 18:42 IST2025-07-30T18:34:53+5:302025-07-30T18:42:17+5:30

जे हात आपली रोजची कामं अगदी भराभर उरकतात त्या हातांची काळजी घेण्यात, त्यांचं सौंदर्य जपण्यात आपण बऱ्याचदा कमी पडतो.
चेहरा छान दिसावा म्हणून कित्येक वेगवेगळे उपाय करतो, पण तळहाताकडे मात्र दुर्लक्ष होतं. त्यात दुचाकी चालवून हात टॅन होतात. हातावरचं टॅनिंग, डेडस्किन वाढून ते अगदी खरखरीत होऊन जातात.
त्यासाठीच आता हे काही उपाय करा आणि हातांना पुन्हा एकदा अगदी मऊसूत करा. हा उपाय करण्यासाठी नेमकं काय करायचं ते पाहूया..
सगळ्यात आधी एका वाटीमध्ये १ चमचा खोबरेल तेल आणि १ चमचा ॲलोव्हेरा जेल घ्या.
त्यामध्ये आता व्हिटॅमिन ई ची १ कॅप्सूल आणि १ चमचा मध घाला. सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून घ्या आणि त्याने हातांना मालिश करा.
५ मिनिटे या मिश्रणाने हाताला मसाज केल्यानंतर हात प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घाला आणि ५- १० मिनिटे ते तसेच पिशवीबंद ठेवा.
यानंतर पिशवी काढून टाका आणि बेसन पावडर, हळद आणि दही यांचं मिश्रण हातावर चोळा. यामुळे हातावरची डेडस्किन, टॅनिंग निघून जाईल आणि ते अगदी स्वच्छ होतील.