Join us   

How To Remove Sun Tan Naturally : उन्हामुळे त्वचा जास्तच काळी पडलीये? फक्त 4 घरगुती उपायांनी मिळवा ग्लोईंग, डागविरहीत चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2022 12:20 PM

1 / 8
उन्हाळ्यात तीव्र सूर्यप्रकाश, उच्च तापमान आणि उष्ण वारे यामुळे आरोग्याचे बरेच नुकसान होऊ शकते.(Sun Tan Solution) उष्णतेपासून वाचण्यासाठी आपण सर्व प्रकारचे उपाय करतो, परंतु तरीही अनेकवेळा कामानिमित्त उन्हात बाहेर जावे लागते. उन्हाच्या तडाख्यामुळे चेहरा टॅनिंग होऊ लागतो. (How To Remove Sun Tan Naturally) (Image Credit- Shruti Arjun Anand)
2 / 8
एकदा चेहरा काळपट पडायला सुरूवात झाली की पुन्हा पूर्वरत व्हायला वेळ लागतो. क्लिनअप, डी टॅन करूनही चेहरा उजळदार दिसत नाही. (Remove Sun Tan Instantly With These Home Remedies) सन टॅन टाळण्यासाठी घराबाहेर पडतानाच काळजी घेतली तर त्वचेचं होणारं नुकसान टाळता येऊ शकतं. (5 Home remedies to remove Sun Tanning)
3 / 8
वजन कमी करण्यासाठी आपण ओट्सचे सेवन करतो, पण जर तुम्ही त्यात दही मिसळून चेहऱ्याला लावले तर ते त्वचेसाठी फायदेशीर ठरेल आणि चेहऱ्याची चमक परत येईल.
4 / 8
हळद आणि बेसन आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. या दोन गोष्टी मिसळून फेस पॅक बनवा. ते चेहऱ्यावर लावल्याने सूर्यप्रकाशाचा प्रभाव कमी होईल. सगळ्यात आधी हळद, बेसनात दूध घालून एकत्र करा. यात तुम्ही मधही घालू शकता. हा पॅक चेहऱ्याला लावून १० ते १५ मिनिटं ठेवा नंतर थंड पाण्यानं चेहरा धुवा.
5 / 8
कॉफीचा वापर आपण स्वत:ला ताजेतवाने करण्यासाठी करतो, पण ती सन टॅन दूर करण्यासाठीही उपयुक्त आहे. एका भांड्यात कॉफी पावडर आणि लिंबाचा रस एकत्र करून पेस्ट तयार करा आणि चेहऱ्याला लावा. कोरडे होण्याची काही वेळ प्रतीक्षा करा आणि नंतर धुवा.
6 / 8
एका भांड्यात काकडीचा रस काढून त्यात गुलाबपाणी मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि थोडा वेळ कोरडे होऊ द्या. त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.
7 / 8
नारळाचा वापर आपण अनेक प्रकारे करतो, पण याचे दूध काढून कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावल्यास चेहरा हायड्रेट होईल आणि सन टॅनपासूनही सुटका मिळेल.
8 / 8
लिंबू आणि मध हे त्वचेसाठी सर्वोत्तम औषध मानले जाते. लिंबाचा रस आणि मध एकत्र करून चेहऱ्यावर लावल्यास सन टॅनिंग दूर होण्यास मदत होते. (Image Credit- Shruti Arjun Anand)
टॅग्स : त्वचेची काळजीब्यूटी टिप्स