1 / 8उन्हाळ्याच्या दिवसांत खूप घाम येतो. अगदी पंख्याखाली बसूनही घाम येतोच. कारण दुपारच्यावेळी खूप गरम हवा असते. घराबाहेर उन्हात जावं लागलं तर मग घाम तर येतोच पण टॅनिंगही होतंच...(how to remove neck tanning in summer?)2 / 8म्हणूनच या दिवसांत चेहऱ्यासोबतच मानेचीही काळजी घ्यावी लागते. कारण घामामुळे, उन्हामुळे मान काळवंडून जाते.(how to reduce neck tanning?)3 / 8आता काळवंडलेली मान स्वच्छ करायची असेल तर पुढे सांगितलेला एक उपाय करून पाहा. यामुळे मानेवरचं टॅनिंग अगदी काही मिनिटांतच कमी होऊ शकतं.(home remedies to remove neck tanning in summer)4 / 8हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये १ चमचा बेसन पीठ आणि १ चमचा मसूर डाळीचे पीठ घ्या. मसूर आणि हरबरा डाळीचे पीठ एकत्र करून वापरले तर त्वचेवर त्याचा खूप चांगला परिणाम दिसून येतो.5 / 8आता या पिठामध्ये अर्ध्या लिंबाचा रस आणि चिमूटभर हळद घाला.6 / 8त्यानंतर त्यामध्ये १ चमचा कोरफडीचा ताजा गर घाला. कोरफडीचा गर घातल्याने त्वचा कोरडी पडत नाही.7 / 8सगळ्यात शेवटी त्यामध्ये दही किंवा कच्चं दूध घाला आणि हा लेप मानेला लावून चोळा. १० मिनिटे लेप मानेवर तसाच राहू द्या.8 / 8त्यानंतर पुन्हा एकदा थोडं पाणी लावून मान चोळा आणि लेप धुवून टाका. मानेवरचा काळेपणा बराच कमी झालेला असेल. आठवड्यातून एकदा हा उपाय करा...