Join us
Daily Top 2 Weekly Top 5

ओठांच्यावर, कानाजवळ, कपाळावर बरेच केस दिसतात? फेशियल हेअर काढून टाकण्यासाठी १ घरगुती उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2026 09:35 IST

1 / 7
काही जणींच्या चेहऱ्यावर म्हणजेच कानाच्या आसपासच्या भागात, कपाळावर, ओठांच्यावर बरेच केस असतात. अशा पद्धतीच्या फेशियल हेअरमुळे चेहरा काळवंडलेला दिसतो. सौंदर्य कमी होतं.(how to remove facial hair?)
2 / 7
म्हणूनच फेशियल हेअर काढून टाकायचे असतील तर पुढे सांगितलेला एक सोपा घरगुती उपाय करून पाहा..(home hacks to remove facial hair)
3 / 7
हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये १ चमचा जिलेटीन पावडर घ्या.(how to make face mask to get rid of facial hair?)
4 / 7
त्यामध्ये १ चमचा मिल्क पावडर घाला. मिल्क पावडरमुळे त्वचा हायड्रेटेड राहण्यास मदत होते.
5 / 7
आता त्यामध्ये १ चमचा हळद घाला. हळदीमुळे चेहऱ्यावर ग्लो येण्यास मदत होते.
6 / 7
सगळ्यात शेवटी त्यामध्ये गरम दूध घाला. सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून घ्या. आता हा लेप चेहऱ्याला लावा. ५ ते ७ मिनिटांनी लेप सुकला की अलगदपणे तो ओढून काढून टाका.
7 / 7
हा उपाय केल्यानंतर चेहरा स्वच्छ धुूवून मॉईश्चराईज करा. फेशियल हेअर बऱ्याच प्रमाणात कमी झालेले असतील. पण हा उपाय सगळ्यांनाच सूट होईल असं नाही. त्यामुळे एकदा पॅच टेस्ट जरुर घ्या.
टॅग्स : ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी