1 / 8काही जणींचे अंडरआर्म्स खूप काळवंडलेले असतात. त्यामुळे मग स्लिव्हलेस कपडे घालण्याचीही त्यांना लाज वाटते.(how to reduce blackness or tanning in underarms?)2 / 8याशिवाय हाताचे कोपरेही अतिशय काळे पडलेले असतात. तिथे डेडस्किन खूप जमा झाल्यामुळे कोपऱ्यांवर अक्षरश: काळे घट्टे पडतात.(home hacks to get rid of tanning on elbow)3 / 8हा त्रास कमी करायचा असेल तर मसूर डाळ अतिशय उपयोगी ठरते. त्यासाठी नेमकं काय करायचं ते पाहा..4 / 8हा उपाय करण्यासाठी १ ते २ चमचे मसूर डाळ चांगली धुवून घ्या आणि पाण्यामध्ये ७ ते ८ तास भिजायला ठेवा.5 / 8त्यानंतर ती डाळ मिक्सरमधून वाटून घ्या. आता मसूर डाळीच्या पेस्टमध्ये थोडं बेसन घाला. यामुळे तिथली डेडस्किन निघून जाण्यास मदत होईल.6 / 8तसेच एक चमचा हळद आणि एका लिंबाचा रस घाला. लिंबामुळे त्वचेचा काळेपणा कमी होतो. आता हा लेप काखेत आणि हाताच्या कोपऱ्यावर लावा.7 / 8१५ ते २० मिनिटांनी धुवून टाका. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा उपाय करा. टॅनिंग, डेडस्किन जाऊन अंडरआर्म्स, हाताचे कोपरे स्वच्छ होतील.8 / 8तुम्ही मानेचा काळेपणा कमी करण्यासाठीही हा उपाय करू शकता. चेहरा चमकदार करण्यासाठीही हा लेप उपयुक्त ठरतो.