1 / 7नाकावर ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स वाढले की चेहरा खूपच विद्रुप दिसायला लागतो. काळवंडलेलं नाक अजिबातच चांगलं दिसत नाही.2 / 7नाकाप्रमाणेच हनुवटी, ओठांच्या दोन्ही कोपऱ्यांजवळची त्वचा याठिकाणीही काही जणांना व्हाईट हेड्स असतात. ते कमी करण्यासाठी पुढे सांगितलेला एक सोपा उपाय करून पाहा.3 / 7हा उपाय करण्यापुर्वी चेहऱ्याला ५ ते ७ मिनिटे वाफ द्या. यामुळे व्हाईटहेड्स, ब्लॅकहेड्स लवकर निघण्यास मदत होतात.4 / 7त्यानंतर एका वाटीमध्ये १ चमचा तांदळाचं पीठ घ्या. त्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस पिळा.5 / 7यानंतर त्यामध्ये अर्धा ते एक चमचा टुथपेस्ट टाका. सगळं मिश्रण हलवून घ्या आणि ते नाकाला लावा.6 / 7एखाद्या मिनिटानंतर चोळून चोळून काढून टाका. चेहरा धुतल्यानंतर ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स बऱ्याच प्रमाणात निघून गेलेले दिसतील.7 / 7आठवड्यातून एकदा हा उपाय केल्यास ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्सचा त्रास होणारच नाही.