1 / 5उन्हामुळे त्वचा खूप काळवंडून जाते. शिवाय उष्णतेमुळे किंवा वारंवार उन्हात गेल्याने त्वचेचा पोतदेखील खराब होतो. 2 / 5म्हणूनच अशा काळवंडून गेलेल्या, उन्हामुळे रापलेल्या त्वचेला पुन्हा एकदा मऊ, मुलायम आणि चमकदार करण्यासाठी पुढे सांगितलेला एक सोपा उपाय करून पाहा...3 / 5हा उपाय करण्यासाठी आपण तांदळाच्या पाण्याचा एका खास पद्धतीने वापर करणार आहोत. त्यासाठी सगळ्यात आधी तांदूळ २ ते ३ वेळा पाण्याने स्वच्छ धुवा आणि त्यानंतर ते एक ते दिड तास पाण्यात तसेच भिजत ठेवा.4 / 5यानंतर तांदूळासकट पाणी गॅसवर गरम करायला ठेवा. पाण्याला उकळी येऊ द्या. पाणी थोडं घट्ट होत आहे असं दिसलं की मग गॅस बंद करावा.5 / 5यानंतर ते पाणी थंड होऊ द्या. नंतर ते गाळून घ्या आणि आईस ट्रे मध्ये घालून त्याचा बर्फ करा. रोज रात्री झोपण्यापुर्वी किंवा उन्हातून आल्यानंतर हा राईस वॉटर आईस चेहऱ्यावरून फिरवा. त्वचेला छान वाटेल. त्वचा छान तुकतुकीत चमकदार होईल.