Join us

मसूर डाळीचा फेस पॅक! 'या' पद्धतीने लावा, डेडस्किन- टॅनिंग होईल दूर, मिळेल पार्लरसारखा इंस्टंट ग्लो..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2025 20:51 IST

1 / 6
बदलते वातावरण, धूळ आणि प्रदूषणाचा सगळ्यात जास्त परिणाम आपल्या त्वचेवर होतो. ज्यामुळे त्वचा काळी पडते, सुरकुत्या येतात, डाग आणि पिंग्मेंटेशनच्या समस्या उद्भवतात. इतकेच नाही तर चेहरा कोरडा पडून त्वचा निस्तेज होते. अशावेळी नेमकं काय करावं समजत नाही. (Masoor dal face pack)
2 / 6
स्वयंपाकघरात आढळणारी मसूर डाळ आपल्या त्वचेसाठी चांगली आहे. यामध्ये अनेक गुणधर्म आहेत जे हरवलेल्या त्वचेचं सौंदर्य पुन्हा नव्यासारखे चमकेल. हा फेस पॅक कसा लावायला हवा जाणून घेऊया.(Face pack for instant glow)
3 / 6
त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्यासाठी आपण मसूर डाळ, कच्चे दूध मिक्स करुन चेहऱ्यावर लावायला हवे. हा फेस पॅक २० मिनिटांनी धुवा. यामुळे डेडस्किन निघून जाईल.
4 / 6
मसूर डाळ, दही आणि तुरटी मिक्स करुन १५ मिनिटे त्वचेवर लावा नंतर चेहरा धुवा. यामुळे त्वचेचा रंग उजळण्यास मदत होईल.
5 / 6
डोळ्यांखाली काळी वर्तुळे, सुरकुत्या असतील तर मसूर डाळ, बटाट्याचा रस आणि एलोवेरा जेल मिक्स करुन चेहऱ्यावर लावा. २० मिनिटांनी त्वचा स्वच्छ करा.
6 / 6
जर आपल्या त्वचेवरील केस काढायचे असतील तर मसूर डाळ, बेसनाचे पीठ, गुलाबजलचा फेस पॅक तयार करुन चेहऱ्याला लावा. सुकल्यानंतर चेहरा चोळा, यामुळे चेहऱ्यावरील केस निघून जाण्यास मदत होईल.
टॅग्स : ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी