1 / 8दिवाळीच्या दिवसांमध्ये स्वस्तात मस्त उपाय करून तुमचा चेहरा चमकवायचा असेल तर हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा..2 / 8हा उपाय आपल्याकडे खूप पुर्वीपासूनच केला जातो. अगदी आपल्या आई, आजी, मावशी, काकूनेही हा उपाय कधी ना कधी नक्कीच केला असणार..3 / 8हा उपाय आठवड्यातून ३ वेळा केल्यास चेहऱ्यावरचं टॅनिंग, पिगमेंटेशन, डेडस्किन निघून तर जाईलच पण त्याचबरोबर त्वचेवर छान ग्लो येईल.4 / 8हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये बेसन पीठ घ्या. बेसन पीठ हे नॅचरल स्क्रबर म्हणून ओळखलं जातं. 5 / 8त्या पिठामध्ये चिमूटभर हळद टाका. हळदीमध्ये असणारे ॲण्टीबॅक्टेरियल आणि ॲण्टीफंगल गुणधर्म त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. 6 / 8आता यामध्ये थोडं कच्चं दूध आणि लिंबाचा रस घालावा. लिंबाचा रस नॅचरल ब्लिचिंग एजंट म्हणून ओळखला जातो. तसेच दुधामधल्या घटकांमुळे त्वचा स्वच्छ होऊन छान मॉईश्चराईज होते.7 / 8आता सध्या वातावरणात थंडी वाढत आहे. त्यामुळे हा फेसपॅक लावून त्वचा कोरडी होऊ नये यासाठी त्यात २ ते ३ थेंब खोबरेल तेल किंवा बदाम तेल घाला. सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून घ्या. 8 / 8त्यानंतर हा पॅक चेहऱ्याला लावून हलक्या हाताने मालिश करा. १० मिनिटांनी पॅक अर्धवट सुकला की तो चोळून काढून टाका. यानंतर चेहरा धुवून मॉईश्चराईज करा. त्वचेमध्ये खूप छान बदल दिसून येईल.