नातवापासून आजीपर्यंत सर्वांनी लावावा ‘असा’ मस्त घरगुती फेसपॅक- दिवाळीत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर येईल तेज
Updated:October 13, 2025 13:19 IST2025-10-13T13:02:53+5:302025-10-13T13:19:01+5:30

दिवाळीच्या दिवसांमध्ये स्वस्तात मस्त उपाय करून तुमचा चेहरा चमकवायचा असेल तर हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा..
हा उपाय आपल्याकडे खूप पुर्वीपासूनच केला जातो. अगदी आपल्या आई, आजी, मावशी, काकूनेही हा उपाय कधी ना कधी नक्कीच केला असणार..
हा उपाय आठवड्यातून ३ वेळा केल्यास चेहऱ्यावरचं टॅनिंग, पिगमेंटेशन, डेडस्किन निघून तर जाईलच पण त्याचबरोबर त्वचेवर छान ग्लो येईल.
हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये बेसन पीठ घ्या. बेसन पीठ हे नॅचरल स्क्रबर म्हणून ओळखलं जातं.
त्या पिठामध्ये चिमूटभर हळद टाका. हळदीमध्ये असणारे ॲण्टीबॅक्टेरियल आणि ॲण्टीफंगल गुणधर्म त्वचेसाठी फायदेशीर ठरतात.
आता यामध्ये थोडं कच्चं दूध आणि लिंबाचा रस घालावा. लिंबाचा रस नॅचरल ब्लिचिंग एजंट म्हणून ओळखला जातो. तसेच दुधामधल्या घटकांमुळे त्वचा स्वच्छ होऊन छान मॉईश्चराईज होते.
आता सध्या वातावरणात थंडी वाढत आहे. त्यामुळे हा फेसपॅक लावून त्वचा कोरडी होऊ नये यासाठी त्यात २ ते ३ थेंब खोबरेल तेल किंवा बदाम तेल घाला. सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून घ्या.
त्यानंतर हा पॅक चेहऱ्याला लावून हलक्या हाताने मालिश करा. १० मिनिटांनी पॅक अर्धवट सुकला की तो चोळून काढून टाका. यानंतर चेहरा धुवून मॉईश्चराईज करा. त्वचेमध्ये खूप छान बदल दिसून येईल.