1 / 9आरशात स्वत: ला पाहिल्यानंतर वाह. अशी प्रतिक्रिया उमटणं हा खरा आत्मविश्वास असतो. मानसशास्त्रानुसार जेव्हा आपल्या शरीराचा आदर करता आणि साध्या, शिस्तबद्ध सवयी लावता, तेव्हा आपले आकर्षण अनेक पटीने वाढते. यासाठी आपल्याला कोणत्याही पार्लरमध्ये जाऊन हजारो रुपये खर्च करण्याची गरज नाही. सौंदर्याची व्याख्या केवळ गोरेपणात नसून ती तुमच्या त्वचेच्या आरोग्यात, डोळ्यांतील चमक आणि तुमच्या प्रसन्न व्यक्तिमत्त्वात असते. (Natural ways to look beautiful without makeup)2 / 9आपल्या धावपळीच्या आयुष्यात आपण अनेकदा पाणी पिणे विसरतो, अपुरी झोप, ताण याचा थेट परिणाम आपल्या सौंदर्यावर होतो. पण आपल्या रोजच्या जीवनशैलीत काही बदल केल्यास सौंदर्यात भर पडेल. जाणून घेऊया, एक रुपयाही खर्च न करता स्वतःला अधिक सुंदर आणि आकर्षक बनवण्याचे ७ सोपे मार्ग. (Face yoga for tightening skin)3 / 9सुंदर दिसण्यासाठी रात्री किमान ७ ते ८ तासांची झोप घेणे हे कोणत्याही महागड्या क्रीमरपेक्षा जास्त प्रभावी आहे. झोपेत आपल्या त्वचेच्या पेशी दुरुस्ती होतात. ज्यामुळे डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी होतात आणि चेहरा टवटवीत दिसतो. 4 / 9दिवसभरात किमान ३ ते ४ लीटर पाणी प्या. पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर फेकून देते. ज्यामुळे त्वचा हायड्रेट राहते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो. 5 / 9हसण्यामुळे चेहऱ्याचे स्नायू सक्रिय होतात, जे नॅचरल फेसलिफ्टचे काम करतात. तसेच रोज २ मिनिटे चेहऱ्याचा व्यायाम केल्याने त्वचा घट्ट होते. 6 / 9अति मीठ खाल्ल्याने चेहऱ्यावर सूज येते, अति साखरेमुळे त्वचेवर अकाली सुरकुत्या पडतात. यासाठी दोन्ही गोष्टी प्रमाणात खा. 7 / 9आपले पोट साफ असेल तर आपल्या चेहरा आपोआप उजळतो. आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा. क्लीन ईटिंग हा पर्याय निवडा. 8 / 9आपले चालणे-बोलणे हे आपल्या सौंदर्यात भर पाडते. नेहमी ताठ चालल्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो आणि आपण अधिक आकर्षक दिसता.9 / 9तणाव आणि राग चेहऱ्यावर सुरकुत्या निर्माण करतात. याउलट, सकारात्मक विचार आणि मनाची शांतता आपल्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज निर्माण करते. स्वतःवर प्रेम करा, त्याचा परिणाम आपल्या सौंदर्यावर नक्कीच दिसेल.