1 / 6काही जणांचे हात कमी वयातच खूप सुरकुतलेले दिसतात. शिवाय उन्हात गाडी चालवून ते टॅनही झालेले असतात. 2 / 6कमी वयातच असे हात सुरकुतलेले असतील तर त्यांना पुन्हा मुलायम करण्यासाठी हा एक घरगुती उपाय करून बघा.3 / 6हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये एक चमचा साय घ्या. सायीमध्ये लॅक्टिक ऍसिड, बटर फॅट आणि व्हिटॅमिन ए असतं. 4 / 6हे तिन्ही घटक त्वचेला छान मॉईश्चराईज करून हायड्रेटेड ठेवतात.5 / 6आता त्यामध्ये ४ ते ५ थेंब कॅस्टर ऑईल घाला. हे दोन्ही पदार्थ एकत्र करून हाताला रात्री झोपण्यापूर्वी मालिश करा. 6 / 6काही दिवस नियमितपणे हा प्रयोग केल्यास हात अतिशय मऊ झालेले दिसतील. शिवाय हातावर लवकर सुरकुत्याही येणार नाहीत.