1 / 6सुंदर चेहरा कुणाला आवडत नाही? आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्यात भुवया अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. जर दाट आणि कोरीव भुवया असतील तर डोळ्यांचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. अनेक महिला पातळ भुवयांमुळे त्रस्त असतात. त्या लपवण्यासाठी महागड्या आयब्रो पेन्सिल किंवा मायक्रोब्लेडिंगसारख्या महागड्या ट्रिटमेंटचा आधार घेतात. पण याचा भुवयांवर विपरीत परिणाम होतो. (natural eyebrow growth)2 / 6आपल्यापैकी अनेकजण भुवया कोरीव आणि दाट करण्यासाठी विविध शेड्सच्या आयब्रो पेन्सिलचा वापर करतात. पण इतके पैसे खर्च करण्याऐवजी काही सोपे घरगुती उपाय केल्यास आपल्याला फरक दिसेल. त्यासाठी भुवयांना कोणतं तेल लावायला हवं पाहूया. (oil for eyebrow growth)3 / 6दाट भुवयांसाठी आपण टी ट्री ऑइलचा वापर करायला हवा. हे तेल भुवयांचे छिद्र उघडतात आणि केसांची वाढ करतात. ज्यामुळे आपल्याला दाट आणि जाड भुवया मिळतात. तेल रात्री झोपण्यापूर्वी लावा. 4 / 6नारळाचे तेल केस आणि त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. हे भुवयांना लावल्यास केसांच्या मुळांना मॉइश्चरायझ करते. ज्यामुळे त्या दाट आणि जाड होण्यास मदत होतात. हलक्या हाताने तेल भुवयांना लावून नियमितपणे मालिश केल्यास फायदा होईल. 5 / 6भुवया जाड करण्यासाठी आपण लैव्हेंडर तेलाचा वापर करु शकतो. रोज भुवयांच्याभोवती या तेलाने मालिश करा. फरक दिसेल. 6 / 6एरंडेल तेलात असणारे 'रिसिनोलेइक ॲसिड' आणि 'फॅटी ॲसिड्स' भुवयांच्या केसांच्या मुळांना खोलवर पोषण देतात ज्यामुळे नवीन केसांची वाढ वेगाने होते. हे तेल भुवयांवर लावा आणि २-३ मिनिटे हलक्या हाताने मसाज करा.