1 / 6सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. या दिवसात त्वचेची जास्त काळजी घ्यावी लागते. अन्यथा त्वचेवरचं टॅनिंग वाढायला लागतं.(how to get rid of tanned skin in summer?)2 / 6ज्या लोकांना या दिवसात टू व्हीलर चालवावी लागते, त्यांचे हात आणि कपाळ जास्त टॅन होते.. कपाळाचा रंग तर इतर चेहऱ्यापेक्षा खूपच वेगळा दिसायला लागतो. 3 / 6अशा पद्धतीने टॅन झालेलं कपाळ आणि हात जर पुन्हा स्वच्छ करायचे असतील तर काय उपाय घरच्याघरी अगदी सोप्या पद्धतीने करता येऊ शकतो ते पाहुया... 4 / 6पहिला उपाय करण्यासाठी एक बटाटा घ्या आणि त्याच्या गोल गोल जाडसर चकत्या करा. 5 / 6त्यावर थोडा मध, कॉफी आणि पिठीसाखर घाला. आता या चकत्या तुमच्या टॅन झालेल्या त्वचेवर चोळा. १० मिनिटांनी चेहरा धुऊन टाका. त्वचा स्वच्छ होईल.6 / 6दुसरा उपाय करण्यासाठी बटाट्याचा रस, लिंबाचा रस आणि दही एका भांड्यात सम प्रमाणात एकत्र करा. त्यात थोडं मसूर डाळीचे पीठ घाला. आता हा लेप त्वचेला लावा.. १० मिनिटांनी लेप थोडा सुकल्यावर चोळून काढून टाका. टॅनिंग बरंच कमी झालेलं दिसेल.