1 / 8उन्हाचा पारा वाढायला लागला की त्याचा परिणाम आपल्या त्वचेवरही होऊ लागतो. उष्णतेमुळे काही जणांच्या त्वचेवर रॅशेस देखील येतात.(skin care tips for summer)2 / 8तर बहुसंख्य लोकांना मात्र ही समस्या असते की उन्हात गेल्यावर त्यांची त्वचा काळवंडून जाते. त्वचेवरचं टॅनिंग खूप वाढतं. त्यामुळे उन्हाळ्यात चेहरा अगदी काळवंडल्यासारखा दिसू लागतो.(how to get rid of tanned skin?)3 / 8म्हणूनच उन्हाळ्यात इतर कोणतीही साबण किंवा फेसवॉश न वापरता त्वचेवरचं टॅनिंग नैसर्गिकपणे काढून टाकणारा एक मास्क घरीच तयार करा आणि तो आठवड्यातून २ ते ३ वेळा वापरा. बघा तुमची त्वचा नेहमीच कशी तुकतुकीत आणि चमकदार राहील.4 / 8हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये १ चमचा बेसन घ्या. त्यामध्ये चिमूटभर हळद घाला.5 / 8१ चमचा जवस भाजून घ्या आणि थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये फिरवून त्याची पावडर करून घ्या.6 / 8बेसन, हळद, जवसाची पावडर एकत्र करा आणि त्यात थोडे गुलाबजल घालून त्याची पेस्ट करून घ्या. आता हा लेप चेहऱ्याला लावा.7 / 8लेप थोडासा सुकत आला की ५ ते ७ मिनिटांनी हलक्या हाताने चोळून लेप काढून टाका. यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या.8 / 8तुम्हाला त्वचेमध्ये खूप छान बदल जाणवेल. शिवाय त्वचेवरचं टॅनिंग, डेडस्किन गेल्याने त्वचा फ्रेश आणि चमकदार दिसेल. तसेच जवसामुळे त्वचेला मऊपणा येईल.