1 / 5साधारण तिशीनंतर बऱ्याच जणींच्या चेहऱ्यावर वांगाचे डाग दिसू लागतात. नाकाच्या जवळचा गालाचा भाग, हनुवटी, कपाळ या ठिकाणी पिगमेंटेशन जरा जास्तच जाणवते.2 / 5हे डाग काढून टाकण्यासाठी आता हा एक सगळ्यात सोपा आणि स्वस्त उपाय बघा. हा उपाय fashionwithfahad या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.3 / 5वांगाचे डाग काढून टाकण्यासाठी आपल्याला तुरटीची मदत घ्यायची आहे. सगळ्यात आधी तर तुरटी फोडून तिची छान पावडर करून घ्या. त्यानंतर एखाद्या गाळणीने ही पावडर गाळून घ्या.4 / 5अर्धा चमचा तुरटीच्या पावडरमध्ये अर्धा चमचा खोबरेल तेल टाका. हे दोन्ही पदार्थ व्यवस्थित एकत्र करा आणि त्याने चेहऱ्याला ५ मिनिटे हळुवार हाताने मसाज करा.5 / 5यानंतर दोन मिनिटांनी चेहरा धुऊन टाका. रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय काही दिवस नियमितपणे केल्यास चेहऱ्यावरील वांगाचे डाग पुर्णपणे निघून जातील.