Join us

कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या- पिगमेंटेशन? 'हा' जादुई स्प्रे मारा.. वय वाढलं तरी तरुणच दिसाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2025 14:43 IST

1 / 7
त्वचेची पुरेशी काळजी घ्यायला वेळ मिळाला नाही तर कमी वयातच चेहरा सुरकुत्या, ओपन पोअर्स, पिगमेंटेशन येऊन खराब दिसू लागतो. त्यामुळे मग कमी वयातच अनेकजणी वयस्कर दिसू लागतात.
2 / 7
तुमच्याही त्वचेच्या बाबतीत असंच झालं असेल तर हा एक सोपा घरगुती उपाय लगेच करून पाहा. हा उपाय rohitsachdeva1 या इन्स्टाग्राम पेजवर सुचविण्यात आला आहे.
3 / 7
हा उपाय नियमितपणे केल्यास चेहऱ्यावरच्या सुरकुत्या, ओपनपोअर्स आणि पिगमेंटेशन कमी होईल. तसेच त्वचेला छान टाईटनेस येऊन त्वचा तरुण, टवटवीत दिसेल.
4 / 7
हा उपाय करण्यासाठी अर्धा ग्लास उकळतं पाणी घ्या. त्या पाण्यात ग्रीन टी बॅग १५ ते २० मिनिटांसाठी भिजत ठेवा.
5 / 7
त्यानंतर दुसऱ्या एका भांड्यात दोन टेबलस्पून तांदूळ घ्या. तांदूळ स्वच्छ धुवा आणि अर्धा ग्लास पाण्यात दोन तास भिजत ठेवा.
6 / 7
यानंतर तांदळाचं पाणी गाळून घ्या. तांदळाचं पाणी आणि ग्रीन टी बॅग बुडवलेलं पाणी एकत्र करा. त्या पाण्यात १ टेबलस्पून ग्लिसरीन टाका.
7 / 7
त्यानंतर त्यामध्ये १ टेबलस्पून ॲलोव्हेरा जेल टाका. पाण्यातले सगळे पदार्थ व्यवस्थित एकत्र करून घ्या आणि ते एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. दिवसातून एकदा चेहरा धुतल्यानंतर हा स्प्रे चेहऱ्यावर मारा. अवघ्या दोन आठवड्यांतच त्वचेमध्ये खूप छान बदल दिसून येईल.
टॅग्स : ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी