1 / 5बऱ्याच जणींच्या बाबतीत असं दिसून येतं की त्यांची मान खूप काळवंडून गेलेली असते (how to get rid of dark neck?). रोजच्या रोज मान स्वच्छ झाली नाही तर ती हळूहळू काळी पडायला लागते. आणि नंतर तिचा काळेपणा एवढा वाढतो की मग तो काढून टाकणं अवघड होतं.(home hacks to clean dark neck)2 / 5म्हणूनच पुढे सांगितलेले काही साधे- सोपे उपाय अधूनमधून नेहमीच करत राहा. यामुळे मानेचा काळवंडलेपणा कमी होईल आणि नंतर ती एकदा स्वच्छ झाल्यानंतर पुन्हा काळी पडणार नाही.(tips and tricks to clean dark neck)3 / 5लिंबाचा रस, पिठीसाखर आणि काॅफी पावडर एकत्र करा आणि लिंबाच्या सालींवर घेऊन ती मानेवर चोळा. यानंतर १० मिनिटांनी मान धुवून टाका. स्वच्छ होईल.4 / 5बेसन, चिमूटभर हळद आणि दही एकत्र करून मानेवर लावा आणि हलक्या हाताने काही मिनिटे मसाज करा. हा उपाय आठवड्यातून २ ते ३ वेळा करा. मान स्वच्छ होईल.5 / 5बटाट्याचा रस हा नॅचरल ब्लिचिंग एजंट म्हणून ओळखला जातो. त्यामुळे मान स्वच्छ करण्यासाठी तो निश्चितच उपयोगी येतो. बटाट्याच्या रसामध्ये काही थेंब लिंबाचा रस आणि थोडं ॲलोव्हेरा जेल घाला. हा लेप मानेला चोळून लावा. १० मिनिटांनी मान धुवून घ्या. स्वच्छ होईल.