1 / 10त्वचेच्या अनेक लहान - मोठ्या समस्या आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्यात बाधा आणतात. त्वचेच्या सर्वात कॉमन समस्यांपैकी एक समस्या म्हणजे डोळ्यांखालील (Do These 6 Things To Reduce Under Rye Darkness) काळेकुट्ट डार्क सर्कल्स.2 / 10 वर्षानुवर्षे डोळ्यांखाली असलेले हट्टी डार्क सर्कल्स केवळ डोळ्यांचे (Remove Dark Circles Permanently fast) सौंदर्यच बिघडवत नाहीत तर संपूर्ण चेहऱ्याचा लूकही खराब करतात.3 / 10जर योग्य वेळीच डार्क सर्कल्सच्या समस्येकडे लक्ष दिले नाही तर ही (How to Get Rid of Dark Circles) समस्या सुटत नाही उलट ती आणखीनच वाढत जाते. ऐन तारुण्यात जर डोळ्यांखाली असे गडद डार्क सर्कल्स आले तर आपण कमी वयातच वयस्कर दिसू लागतो.4 / 10yogawithkamya_या इंस्टाग्राम अकाउंटवरुन डोळ्यांखालील डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी कोणत्या ६ गोष्टी नियमितपणे केल्याचं पाहिजेत याबद्दल अधिक माहिती व्हिडीओमध्ये शेअर केली आहे. 5 / 10१. सकाळी उठल्या उठल्या तोंडात पाणी भरून ठेवून. तोंडावर आणि डोळ्यांवर थंड पाणी मारावे. यामुळे डोळ्यांचा थकवा कमी होण्यास मदत मिळते. याचबरोबर, डोळ्यांच्या आजूबाजूची त्वचा स्वच्छ धुतली जाऊन त्वचेला आराम मिळतो. डोळ्यांना आलेली सूज किंवा पफीनेस देखील कमी होण्यास फायदेशीर ठरते. 6 / 10२. डोळ्यांखालील त्वचेला शुद्ध आणि ताजे एलोवेरा जेल लावून हलक्या हाताने मसाज करावा. रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यांखालील त्वचेला एलोवेरा जेल लावून रात्रभर ते तसेच त्वचेवर राहू द्यावे. फक्त बनावट किंवा हिरव्या रंगाच्या आर्टिफिशियल एलोवेरा जेल वापरणे टाळावे. पांढरेशुभ्र एलोवेरा जेल लावावे. 7 / 10 ३. डोळ्यांच्या सुरुवातीच्या आणि शेवटच्या टोकांवर बोट ठेवून, २० वेळा डोळ्यांची उघडझाप करावी. याचबरोबर, डोळे गोलाकार आकारात देखील १० वेळा फिरवा. यामुळे डोळ्यांना आराम मिळून थकवा कमी होतो, तसेच ब्लडसर्क्युलेशन चांगल्या पद्धतीने झाल्याने डोळ्यांखालील त्वचा काळी पडत नाही. 8 / 10४. आपल्या रोजच्या आहारातून मिठाचे प्रमाण कमी करा. जास्त खारट पदार्थ खाणे टाळा. भरपूर पाणी प्या. दिवसभरात स्वतःला हायड्रेटेड ठेवा. हायड्रेशमुळे डोळ्यांखालील त्वचा मऊमुलायम आणि चमकदार बनते. 9 / 10५. स्क्रीन टाईम मर्यादित ठेवा. शक्यतो जास्तवेळ स्क्रीन पाहणे टाळा. झोपण्यापूर्वी किमान २ ते ३ तास स्क्रीन पाहू नका. दिवसभरात जास्त वेळ किंवा रात्रीच्या वेळी स्क्रीन पाहिल्याने त्यांच्या थेट डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. यामुळे डोळ्यांखालील डार्क सर्कल्स वाढतच जातात, यामुळे स्क्रीनचा वापर कमीत कमी करावा. 10 / 10६. रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यांखालील त्वचेला हलक्या हाताने मसाज करा. याचबरोबर, हातांच्या बोटांनी हलकेच दाब देत टॅपिंग करावे यामुळे डोळ्यांना आराम मिळतो. तसेच डोळ्यांखालील त्वचेचे ब्लडसर्क्युलेशन चांगल्या पद्धतीने झाल्याने डोळ्यांखालील त्वचा काळी पडत नाही.