1 / 7उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले की खूप घाम यायला लागतो. सकाळी आंघोळीनंतर काही वेळ आपण फ्रेश असतो. पण नंतर जसा घाम वाढायला लागतो तशी तशी अंगाला खूप दुर्गंधी यायला लागते.2 / 7कधी कधी तर डिओ, परफ्यूम मारूनही उपयोग होत नाही. अशावेळी शरीराची दुर्गंधी घालविण्यासाठी काय उपाय करायला पाहिजे ते पाहुया..3 / 7आंघोळीच्या पाण्यामध्ये लिंबाचा रस किंवा ॲपल साईड व्हिनेगर घाला आणि त्याने आंघोळ करा. बराच वेळ फ्रेश वाटेल.4 / 7रोज वॉटर किंवा कोणतंही इसेंशियल ऑईल आंघोळीच्या पाण्यात घालून आंघोळ केल्यासही खूप चांगला परिणाम दिसून येईल.5 / 7आहारात काकडी, टरबूज, खरबूज असे पाणीदार पदार्थ जास्त प्रमाणात असू द्या. यामुळे शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होईल.6 / 7अंडरआर्म्समधले केस नियमितपणे स्वच्छ करा. त्यामुळेही काखेत घाम कमी येईल आणि शरीराची दुर्गंधी कमी होईल. 7 / 7दिवसातून दोन वेळ थंड पाण्याने आंघोळ करा. यामुळे शरीर स्वच्छ होत राहील आणि घामाचा वास येणार नाही.