उन्हाळ्यात शरीराला घामाचा उग्र वास येऊन चारचौघांत लाज वाटते? दुर्गंधी कमी करण्यासाठी ५ टिप्स
Updated:April 6, 2026 18:40 IST2026-04-06T18:33:58+5:302026-04-06T18:40:50+5:30

उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले की खूप घाम यायला लागतो. सकाळी आंघोळीनंतर काही वेळ आपण फ्रेश असतो. पण नंतर जसा घाम वाढायला लागतो तशी तशी अंगाला खूप दुर्गंधी यायला लागते.
कधी कधी तर डिओ, परफ्यूम मारूनही उपयोग होत नाही. अशावेळी शरीराची दुर्गंधी घालविण्यासाठी काय उपाय करायला पाहिजे ते पाहुया..
आंघोळीच्या पाण्यामध्ये लिंबाचा रस किंवा ॲपल साईड व्हिनेगर घाला आणि त्याने आंघोळ करा. बराच वेळ फ्रेश वाटेल.
रोज वॉटर किंवा कोणतंही इसेंशियल ऑईल आंघोळीच्या पाण्यात घालून आंघोळ केल्यासही खूप चांगला परिणाम दिसून येईल.
आहारात काकडी, टरबूज, खरबूज असे पाणीदार पदार्थ जास्त प्रमाणात असू द्या. यामुळे शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होईल.
अंडरआर्म्समधले केस नियमितपणे स्वच्छ करा. त्यामुळेही काखेत घाम कमी येईल आणि शरीराची दुर्गंधी कमी होईल.
दिवसातून दोन वेळ थंड पाण्याने आंघोळ करा. यामुळे शरीर स्वच्छ होत राहील आणि घामाचा वास येणार नाही.