हात- पाय काळे पडले? घ्या मस्त उपाय- घरच्याघरी फुकटात मिळेल पेडिक्युअर- मेनिक्युअरसारखा इफेक्ट
Updated:June 11, 2025 12:36 IST2025-06-11T12:29:32+5:302025-06-11T12:36:19+5:30

how to get rid of blackness from hands and leg, simple trick to remove tanning and dead skin from hands and leg, how to do manicure and pedicure at home?
हा उपाय करण्यासाठी आपल्याला टुथपेस्ट लागणार आहे. दात स्वच्छ करण्यासाठी जसे टुथपेस्ट उपयुक्त ठरते, तसेच ते हातापायांवरचे टॅनिंग कमी करण्यासाठीही फायदेशीर ठरते.
हा उपाय amita_makeove या इंस्टाग्राम पेजवर सुचविण्यात आला आहे. हा उपाय करण्यासाठी एक लिंबू घ्या आणि ते मधोमध कापून त्याचे दोन भाग करा. लिंबामध्ये असणारे ॲण्टीऑक्सिडंट्स आणि सायट्रिक ॲसिड त्वचेचा रंग सुधारण्यास मदत करतात.
आता लिंबाच्या फोडीवर थोडी साखर घाला. साखरेमुळे त्वचेवरील डेडस्किन जाऊन त्वचा चमकदार होते.
त्यावरच आता थोडा मध घाला. मधामुळे त्वचा स्वच्छ होऊन हायड्रेटेड राहण्यास मदत होते.
आता या मिश्रणावर सगळ्यात शेवटी कोणतेही टुथपेस्ट घाला. आणि लिंबाच्या फोडीवर हलकासा दाब देऊन ती फोड काळवंडलेल्या हातापायांवर घासा.
लिंबाचा रस, मध, साखर आणि टुथपेस्ट यामुळे काही मिनीटांतच त्वचा स्वच्छ होईल. हा सोपा प्रयोग एकदा घरच्याघरी करून पाहा.