1 / 6चेहऱ्यावरचे ॲक्ने, पिंपल्स कमी करण्यासाठी किंवा ज्यांची त्वचा खूप ऑईली आहे त्यांच्यासाठी हा उपाय अतिशय उपयुक्त ठरणारा आहे..2 / 6काही जणांना पिंपल्सचा खूपच त्रास असतो. काही केल्या चेहऱ्यावरचे पिंपल्स कमी होत नाहीत. असं तुमच्याही बाबतीत होत असेल तर हा उपाय करून पाहाच.3 / 6हा उपाय करण्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी घ्या. त्या पाण्यामध्ये कडिपत्त्याची ८ ते १० पाने घाला. कडिपत्ता त्वचेचा तेलकटपणा कमी करण्यास मदत करतो. तसेच तो ॲक्ने आणि पिंपल्स कमी करण्यासाठीही उपयुक्त ठरतो.4 / 6याच पाण्यात ४ ते ५ लवंग घाला आणि हे पाणी उकळून घ्या.5 / 6आता या उकळलेल्या पाण्याची वाफ घ्या. लवंग आणि कडिपत्त्यामध्ये असणारे काही घटक तुमच्या त्वचेचा तेलकटपणा कमी करण्यासाठी मदत करतील. 6 / 6यामुळे ॲक्ने आणि पिंपल्स कमी होऊन चेहरा स्वच्छ, नितळ होईल. त्वचा चमकदार दिसेल. हा उपाय mirror_salon_academy_nashik या इंस्टाग्राम पेजवर सुचविण्यात आला आहे.