Join us

अंडरआर्म्सचा काळपटपणा होईल दूर, पांढऱ्या पदार्थाचा 'असा' करा उपयोग, ५ सोप्या पद्धती- दिसेल फरक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2025 17:09 IST

1 / 7
घामामुळे आपल्या काखेत थर तयार होतो. ज्यामुळे अंडरआर्म्स काळे पडू लागतात. अनेकदा आपल्याला स्लीव्हेलस कपडे घालण्यासही यामुळे संकोच वाटतो.(how to get rid of black underarms naturally)
2 / 7
काळ्या अंडरआर्म्सच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी काही घरगुती उपाय करु शकता. यासाठी तुरटीचा वापर करु शकतो. (how to use alum for dark underarms)
3 / 7
काळ्या अंडरआर्म्सच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी आपण तुरटी आणि लिंबाचा वापर करु शकतो. यामुळे काळपटपणा दूर होईल.
4 / 7
चमचाभर तुरटीचा पावडर घेऊन त्यात पाणी घाला. हे मिश्रण अंडरआर्म्सवर लावा. १५ ते २० मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा.
5 / 7
तुरटी आणि हळद त्वचेवरील डाग आणि काळेपणा दूर करण्यास मदत करते. चिमूटभर हळद आणि तुरटीचे पाणी घाला. १० ते १५ मिनिटांनी पाण्याने धुवा.
6 / 7
काखेतील काळेपणा दूर करण्यासाठी तुरटीमध्ये दही मिसळून लावू शकता. डाग कमी करण्यासाठी आणि त्वचेचा रंग सुधारण्यासाठी याचा फायदा होईल.
7 / 7
तुरटी आणि कोरफडचा गर वापरुन आपण अंडरआर्म्सचा काळेपणा दूर करु शकतो. कोरफडच्या गरात तुरटी पावडर मिसळून ही पेस्ट काखेत लावा. अर्धा तासानंतर पाण्याने धुवा.
टॅग्स : ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी