1 / 7आजच्या धावपळीच्या जीवनात सकाळी आरशासमोर उभं राहून जड मेकअप करण्यासाठी वेळ कोणाकडेच नसतो. तरीही ऑफिसमध्ये फ्रेश दिसायचं असो किंवा डेटला नॅचरल आणि आकर्षक वाटायचं असो, ‘नो-मेकअप’ ग्लो हा प्रत्येकाचा आवडता पर्याय ठरतो.2 / 7चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी महागडी उत्पादने किंवा पार्लरची गरज नसून, फक्त ५ मिनिटांची योग्य काळजी पुरेशी ठरते. मेकअप न करता ऑफिस किंवा डेटवर जायचं असेल तर काय करायला हवं पाहूया. 3 / 7बाहेर जाण्याआधी चेहरा सौम्य फेसवॉशने किंवा साध्या थंड पाण्याने धुवा. ज्यामुळे त्वचेवरील धूळ, तेलकटपणा निघून जातो. थंड पाणी त्वचेतील रक्तसंचार वाढवते, ज्यामुळे चेहरा टवटवीत दिसतो.4 / 7यानंतर स्वच्छ कापडात बर्फ घेऊन हलक्या हाताने १–२ मिनिटं चेहऱ्यावर फिरवा. यामुळे ओपन पोअर्स घट्ट होतात, चेहऱ्यावरील सूज कमी होते आणि नैसर्गिक चमक येते. 5 / 7चेहरा कोरडा दिसू नये म्हणून मॉइश्चरायझर लावा. क्रीमरऐवजी कोरफडीचा गर, हायलुरॉनिक जेल किंवा जेल बेस मॉइश्चरायझर वापरल्यास त्वचा ओलसर राहते आणि नॅचरल ग्लो दिसतो. 6 / 7नो- मेकअप लूकमध्ये ओठ कोरडे दिसत असतील तर लिप बाम लावा, भुवयांसाठी काही गोष्टी वापरल्या तर चेहरा अधिक फ्रेश दिसतो. यासाठी काजळ आणि मस्करा वापरा. 7 / 7तसेच भरपूर पाणी प्या. घराबाहेर पडण्यापूर्वी एक ग्लास पाणी किंवा कोमट पाणी प्यायल्याने त्वचा हायड्रेट राहते, ज्याचा परिणाम चेहऱ्यावर लगेच दिसतो.