Join us   

How to get natural looking red hair : केस खूप पांढरे झालेत? घरच्याघरीच बीटाची 'अशी' पेस्ट लावून मिळवा नॅच्युरल रेड हेअर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 5:39 PM

1 / 8
केसांना कलरफूल बनवणं हा प्रत्येक स्त्रीला आवडतं. आजकाल लाल म्हणजेच बरगंडी रंग खूप ट्रेंडमध्ये आहे. या रंगाचा ट्रेंड फॉलो करून मोठमोठे स्टार्सही सर्वसामान्यांमध्ये उत्साह वाढवत आहेत. परंतु केसांना कलर करताना वापरलेली रसायने केसांसाठी खूप हानिकारक असतात हे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. यामुळे केस खडबडीत तर होतातच पण केसांची मुळंही कमकुवत होतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी केसांना रंग देण्याचे नैसर्गिक मार्ग सांगणार आहोत. (How can I make my red hair look natural?)
2 / 8
जर तुम्ही बरगंडी शेडचे चाहते असाल, म्हणजेच तुम्हाला केसांना लाल रंग देणं आवडत असेल तर तुम्ही ते फक्त बीटरूटच्या मदतीने करू शकता. आज आम्ही तुम्हाला बीट रूटचा वापर केसांवर कसा करायचा. याबाबत सांगणार आहोत. (Hair color ideas Ways to Look Like a Natural Red hair)
3 / 8
जर तुम्हाला तुमच्या केसांमध्ये नैसर्गिक आणि डार्क लाल शेड हवी असेल तर तुम्ही बिंधास्त बीटरूट वापरू शकता. यासाठी कमीत कमी एक ग्लास बीटरूटचा रस थोड्या गाजराच्या रसात मिसळा आणि नंतर ते मिश्रण केसांना लावा. साधारण एक ते दोन तास राहू द्या. हा रस केसांमध्ये सुकायला लागल्यावर केस धुवा.
4 / 8
याशिवाय बीटरूटचे काप पाण्यात उकळून थंड करून या पाण्यानं केस धुवू शकता. हे केमिकलयुक्त उत्पादनांपेक्षा हजार पटीने अधिक फायदेशीर आहे. यामुळे तुमच्या केसांना इजा होणार नाही आणि तुमचे केस नैसर्गिकरित्या लाल होतील.
5 / 8
गाजराच्या वापरामुळे केसांना वेगळी लाल शेड मिळू शकते. यासाठी काही गाजरं घ्या आणि त्यांचा रस प्रथम काढा. आता या रसाने केस धुवा. जर तुम्हाला थोड्याच केसांना कलर करायचे असेल तर याच रसाने केस धुवा. हा रस किमान एक तास असाच राहू द्या, त्यानंतर केस सामान्य पाण्याने धुवा. असे एक किंवा दोनदा केल्याने तुमचे केस नैसर्गिकरित्या लाल होतील.
6 / 8
अक्रोडाचा वापर केल्याने केस बराच काळ रंगीत राहतात. यासाठी तुम्ही अक्रोडाची साल वापरू शकता. यासाठी प्रथम अक्रोडाची साले बारीक करून त्याची पेस्ट बनवा. त्यानंतर मंद आचेवर थोडे पाणी घालून ही पेस्ट किमान अर्धा तास उकळवा. आता ही पेस्ट थंड झाल्यावर केसांना लावा. कोरडे झाल्यावर केस सामान्य पाण्याने धुवा.
7 / 8
कॉफी पावडर पाण्यात उकळून, तयार पाण्यात १ टेबलस्पून कंडिशनर टाकून केस धुतल्याने केसांना नैसर्गिकरीत्या तपकिरी रंग येतो. तसेच केस सुस्थितीत आहेत. या पाण्याने आठवड्यातून 2-3 वेळा केस धुवा.
8 / 8
आजकाल केस पांढरे होण्याच्या समस्येने अनेकजण त्रस्त असतात. अशा स्थितीत केसांना काळा रंग देण्यासाठी आवळा, शिककाई, रेठा, मुलतानी माती इत्यादी पावडर मिसळा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात काळ्या चहाच्या टि बॅग्स शकता. यामुळे केसांना काळा रंग येईल. यासोबतच केस रेशमी, चमकदार आणि पोषणही होतील.
टॅग्स : ब्यूटी टिप्सहेल्थ टिप्सकेसांची काळजी