Join us

घरच्याघरी फेशियल करण्याची सगळ्यात सोपी पद्धत- आजच करा- दसऱ्याच्या दिवशी चेहरा चमकेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2025 15:38 IST

1 / 8
दसरा आता अवघ्या २ दिवसांवर आलेला आहे. पण तरीही बऱ्याच जणींच्या घरी नवरात्र बसलेलं असल्याने त्यांना फेशियल, क्लिनअप करून घेण्यासाठी पार्लरला जाणं होत नाही.
2 / 8
दसऱ्याच्या दिवशी आपणही छान दिसावं असं वाटत तर असतं, पण चेहरा खूप टॅन झालेला असतो. डेडस्किन, ब्लॅकहेड्स, व्हाईट हेड्सही खूप वाढलेले असतात.
3 / 8
अशावेळी टॅनिंग, डेडस्किन, ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स कमी करण्यासाठी घरच्याघरी अतिशय सोप्या पद्धतीने फेशियल करून पाहा. ते नेमकं कसं करायचं ते पाहूया...
4 / 8
यासाठी सगळ्यात आधी १ चमचा कच्चं दूध आणि अर्धा चमचा दही घ्या. या मिश्रणामध्ये कापूस बुडवा आणि त्याने सगळा चेहरा स्वच्छ पुसून घ्या. कच्चं दूध आणि दही त्वचेला स्वच्छ करून छान मॉईश्चराईज करतात.
5 / 8
यानंतर एखाद्या मिनिटासाठी वाफ घ्या. वाफेसाठी तुम्ही मशिनही वापरू शकता किंवा मग पातेल्यामध्ये पाणी गरम करून त्यानेही वाफ घेऊ शकता.
6 / 8
वाफ घेतल्यानंतर त्वचेला स्क्रबिंग करणं गरजेचं आहे. यासाठी कॉफी पावडर, पिठीसाखर, मध आणि २ ते ३ थेंब खोबरेल तेल हे मिश्रण एका वाटीमध्ये एकत्र करा. या मिश्रणाने त्वचेला हलक्या हाताने गोलाकार चोळून ५ ते ७ मिनिटांसाठी मसाज करा. यामुळे टॅनिंग, ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स कमी होतात.
7 / 8
यानंतर चेहऱ्यासाठी आपल्याला घरगुती पद्धतीने फेसमास्क तयार करायचा आहे. यासाठी मुलतानी माती आणि गुलाब पाणी एकत्र करा आणि हा लेप चेहऱ्याला लावा. ८ ते १० मिनिटांनी लेप अर्धवट सुकल्यानंतर चेहरा धुवून टाका.
8 / 8
यानंतर चेहरा मॉईश्चराईज करा. बघा त्वचेमध्ये खूप छान बदल झालेला दिसेल. त्वचा छान चमकेल.
टॅग्स : शारदीय नवरात्रोत्सव २०२५त्वचेची काळजीहोम रेमेडीब्यूटी टिप्स