How to remove dark circles : डार्क सर्कल्समुळे चेहरा थकल्यासारखा, वयस्कर वाटतोय? टवटवीत, ग्लोईंग त्वचेसाठी हे घ्या उपाय
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 17:19 IST
1 / 10कोणाचाही चेहरा पाहिल्यानंतर लक्ष वेधून घेतात ते म्हणजे डोळे. डोळ्यांखाली जर काळी वर्तुळ असतील तर तुम्ही आहात त्या वयापेक्षा जास्त म्हातारे दिसता. तर कधी चेहरा जास्त थकल्यासारखा वाटतो. 2 / 10जर डार्क सर्कल्सकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर हे डाग कायमस्वरूपी तसेच राहतात. काही घरगुती उपायांचा नियमित वापर केला तर तुम्ही डार्क सर्कल्सच्या समस्येपासून सुटका मिळवू शकता. (How to remove Dark Circles) 3 / 10बटाट्यामुळे डार्क सर्कल कमी होण्यासही मदत होते. बटाटा किसून घ्या आणि बटाट्याचा जास्तीत जास्त रस काढा. मग थोडा कापूस घ्या. बटाट्याच्या रसात पूर्णपणे भिजवून डोळ्यांवर ठेवा. लक्षात ठेवा कापूस संपूर्ण काळ्या भागावर असावा. आठवडाभरात तुम्हाला त्याचा परिणाम दिसेल.4 / 10तुम्ही टी बॅग अनेकदा पाहिल्या असतील, ज्या बारीक कापडाच्या असतात आणि त्यात चहाची पाने भरलेली असतात. त्यांच्या मदतीने तुम्ही काळ्या वर्तुळांपासून देखील मुक्त होऊ शकता. यासाठी चहाच्या पिशव्या घ्या. ग्रीन टी असेल तर अजून छान. काही वेळ फ्रीजमध्ये ठेवा. ते थंड झाल्यावर डोळ्यांवर ठेवा. ही प्रक्रिया घरी शक्य तितक्या वेळा करा.5 / 10बदामामध्ये व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असते आणि या तेलामुळे त्वचा मुलायम होते. तुम्ही बदामाच्या तेलाचे अनेक पदार्थ बाजारात पाहिले असतील. त्याचा वापर खूप सोपा आहे. थोडे बदामाचे तेल घेऊन ते डार्क सर्कलवर लावावे लागेल, हलक्या हातांनी मसाज करावे लागेल आणि नंतर असेच सोडा. सकाळी उठल्यावर डोळे स्वच्छ धुवा. त्याचा परिणाम आठवडाभरात दिसून येईल.6 / 10थंड दुधाच्या सतत वापराने, आपण केवळ काळी वर्तुळे दूर करू शकत नाही, तर आपण आपले डोळे सुधारू शकता. तुम्हाला फक्त कापूस बाऊलमध्ये ठेवलेल्या थंड दुधात बुडवून डार्क सर्कल भागात ठेवावा लागेल. कापूस 10 मिनिटे ठेवा आणि नंतर साध्या पाण्याने डोळे धुवा.7 / 10त्वचेवर जर काळी वर्तुळे असतील तर त्यातही संत्री मदत करू शकतात. तुम्हाला संत्र्याच्या रसात ग्लिसरीनचे काही थेंब मिसळावे लागेल आणि हे मिश्रण काळ्या वर्तुळांवर लावावे लागेल. यामुळे काळी वर्तुळे तर दूर होतीलच पण डोळ्यांना नैसर्गिक चमकही येईल.8 / 10घरगुती उपचारांचा विचार केला तर त्यात योग आणि ध्यान यांचाही समावेश होतो. खराब जीवनशैलीदेखील गडद वर्तुळांसाठी कारणीभूत आहे, तर योग यामध्ये मदत करू शकतो. घरी काही मिनिटे योगा आणि ध्यान केल्याने काळी वर्तुळे तर कमी होतीलच, पण संपूर्ण शरीरही चांगले राहिल.9 / 10गुलाबपाणी त्वचेला स्वच्छ आणि ताजेतवाने करण्यासाठी तसेच काळी वर्तुळे काढून टाकण्यासाठी वापरू शकता. कापूस गुलाब पाण्यात भिजवून काळ्या वर्तुळांवर ठेवा. 15 मिनिटे कापूस डोळ्यांवर ठेवा आणि नंतर थंड पाण्याने डोळे धुवा. ही प्रक्रिया सतत महिनाभर केल्यानंतर त्याचा परिणाम दिसून येईल.10 / 10टोमॅटोमुळे फक्त काळी वर्तुळे कमी होत नाहीत तर त्वचा मुलायम होते. तुम्ही एक चमचा टोमॅटोचा रस घ्या, त्यात एक चमचा लिंबू घाला आणि नंतर हे मिश्रण डोळ्यांना लावा. 10 मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर धुवा. दिवसातून किमान दोनदा असे करा. हळूहळू काळी वर्तुळे कमी होऊ लागतील.