Join us

हातापायाची त्वचा थंडीमुळे कोरडी पडली? हा घरगुती लेप लावा- त्वचा होईल मऊ- चमकदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2024 16:27 IST

1 / 7
थंडीमुळे हातापायाची त्वचा खूप कोरडी पडते. अंग उलल्यासारखे होते. थंडीमध्ये बऱ्याच जणांची त्वचा टॅन हाेऊन अगदी काळवंडून जाते.(homemade scrub for dry skin in winter)
2 / 7
असं झालं असल्यास त्वचेवरचे पिगमेंटेशन कसे कमी करायचे आणि त्वचेला नैसर्गिक पद्धतीने पुन्हा मऊ- मुलायम कसं करायचं (how to make scrub for glowing skin at home?), याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ डॉक्टरांनी dr.vivek_joshi या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.(best home remedies for winter skin care)
3 / 7
यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की सगळ्यात आधी एका वाटीमध्ये १ टेबलस्पून खोबरेल तेल घ्या. कारण हिवाळ्यात कोरड्या पडलेल्या त्वचेला पुन्हा मऊ, मुलायम करण्यासाठी खोबरेल तेल अतिशय उपयुक्त ठरते.
4 / 7
यानंतर खोबरेल तेलामध्ये १ टीस्पून साखर टाका. साखरेमुळे त्वचेवरील डेड स्किन तर निघून जातेच पण साखरेमध्ये असणारे घटक त्वचेला छान चमक देतात.
5 / 7
त्यानंतर त्यामध्ये १ टीस्पून लिंबाचा रस टाका. लिंबाचा रस हा नॅचरल ब्लिचिंग एजंट म्हणून ओळखला जातो. त्वचेवरचं टॅनिंग काढून टाकण्यासाठी तो उपयुक्त ठरतो.
6 / 7
सगळ्यात शेवटी या मिश्रणात १ टेबलस्पून मध टाका. कारण मध त्वचेला खूप छान हायड्रेटेड ठेवतो. हे सगळे पदार्थ व्यवस्थित एकत्र करा आणि त्वचेवर चोळा.
7 / 7
त्यानंतर साधारण १५ मिनिटांनी नुसत्या पाण्याने त्वचा धुवून टाका. त्वचेमध्ये खूप छान फरक पडलेला दिसेल.
टॅग्स : ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडीथंडीत त्वचेची काळजी