1 / 6धूळ, प्रदुषण, ऊन यामुळे तसेच त्वचेची योग्य ती काळजी न घेतल्याने त्वचेचा पोत खराब होत जातो. 2 / 6त्यामुळे त्वचा तर ड्राय- डल होतेच, पण त्वचेवर खूप पिगमेंटेशनही दिसू लागतं. म्हणूनच आता हा त्रास कमी करून चमकदार त्वचा मिळविण्यासाठी हा एक अतिशय सोपा घरगुती उपाय करून पाहा. हा उपाय smakeup_tips43 या इन्स्टाग्राम पेजवर सुचविण्यात आला आहे. 3 / 6हा उपाय करण्यासाठी आपल्याला तांदळाचं पाणी आणि इतर ३ पदार्थ वापरायचे आहेत. सगळ्यात आधी तर २ टेबलस्पून तांदूळ एका वाटीत घ्या आणि २ वेळा पाणी बदलून ते स्वच्छ धुवून घ्या. यानंतर त्यात अर्धी वाटी पाणी घाला आणि ३ ते ४ तास ती वाटी झाकून ठेवा.4 / 6४ तासांनी पाणी गाळून घ्या. त्यामध्ये १ टेबलस्पून रोज वाॅटर टाका.5 / 6रोज वाॅटर टाकल्यानंतर १ टेबलस्पून ॲलोव्हेरा जेल आणि व्हिटॅमिन ई ची १ कॅप्सूल टाका. सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. हे पाणी फ्रिजमध्ये ठेवून तुम्ही १५ दिवस वापरून शकता. 6 / 6रोज रात्री झोपण्यापुर्वी चेहरा स्वच्छ धुवून घ्या आणि हे पाणी चेहऱ्यावर मारा. रात्रभर तुमच्या त्वचेला छान पोषण मिळेल आणि आठवडाभरातच त्वचेवर खूप छान फरक दिसून येईल.