Join us

त्वचा सतत तेलकट-चिपचिपी दिसते? ३ फेसपॅक, पिंपल्स-पिगमेंटेशन जाऊन चेहऱ्यावर येईल तेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2025 19:05 IST

1 / 6
आपल्यापैकी अनेकजण त्वचेची काळजी योग्य पद्धतीने घेतात. परंतु, पाऊस, दमट वातावरण यामुळे त्वचा चिकट, तेलकट होते. ज्यामुळे मुरुमे-पिंपल्स येण्याची शक्यता अधिक असते. (Home remedies for oily skin)
2 / 6
अशावेळी त्वचा निरोगी, चमकदार ठेवण्यासाठी आपण काही केमिकल्स उत्पादनांचा त्वचेवर वापर करतो. तरीदेखील चेहरा तेलकट दिसतो. यावेळी काही घरगुती उपाय केल्यास त्वचेवरील तेलही कमी होईल आणि ती उजळण्यासही मदत होईल. (Natural glow face packs)
3 / 6
चंदन पावडर त्वचेला थंडावा देते आणि रंग सुधारते. त्यासाठी चमचाभर चंदन पावडरमध्ये गुलाबपाणी घालून त्याची पेस्ट तयार करा. त्वचेवर १५ मिनिटे लावून नंतर चेहरा धुवा.
4 / 6
बेसन आणि दही त्वचेला स्वच्छ करुन मॉइश्चरायझ करते. त्यासाठी चमचाभर बेसनात चिमूटभर हळद घाला. त्याच दही घालून पेस्ट बनवा. हे पेस्ट चेहऱ्यावर लावा. नंतर हलक्या हाताने चेहरा स्वच्छ करा.
5 / 6
१ चमचा कोरफडीचा गर, १ चमचा मध मिसळून चेहऱ्यावर लावा. २० मिनिटानंतर चेहरा स्वच्छ धुवा.
6 / 6
हे फेस पॅक त्वचेवरील तेल कमी करण्यास मदत करतात. तसेच आठवड्यातून एकदा लावल्याने त्वचा मऊ आणि चमकदार होण्यास मदत होते.
टॅग्स : ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी