1 / 6केस गळण्याची समस्या खूप वाढली असेल किंवा तुमच्या केसांना अजिबातच वाढ नसेल तर पुढे सांगितलेला एक सोपा उपाय लगेचच करून पाहा..2 / 6आपल्याला माहितीच आहे की कांद्यामध्ये असणारं सल्फर आणि इतर घटक केसांची चांगली वाढ होण्यासाठी मदत करतात. त्यामुळे आपल्याला कांद्याचा रस वापरूनच केसासांठी एक खास शाम्पू तयार करायचा आहे.3 / 6हा शाम्पू तयार करण्यासाठी १ मध्यम आकाराचा लाल कांदा घ्या आणि तो बारीक चिरा. 4 / 6त्यामध्ये थोडी रोजमेरीची ताजी पानं टाका. ही पानं तुम्हाला तुमच्या शहरातल्या नर्सरीमध्ये सहज मिळतील. कांदा आणि रोजमेरीची पानं मिक्सरमध्ये टाकून त्यांची पेस्ट करा आणि नंतर ती गाळून त्याचं पाणी काढून घ्या.5 / 6यानंतर एका बाटलीमध्ये कांदा आणि रोजमेरीचं गाळून घेतलेलं पाणी टाका. जेवढं पाणी असेल त्याच्या अर्ध्या प्रमाणात कोणताही सल्फेट फ्री शाम्पू घाला. सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या.6 / 6आता या मिश्रणाने आठवड्यातून दोन वेळा केस धुवा. काही दिवस नियमितपणे हा उपाय केल्यास केस गळणं कमी झालेलं जाणवेल आणि केसांचीही चांगली वाढ होईल.