1 / 6त्वचेवरचा ग्लो कमी झाला असेल किंवा डेडस्किन, टॅनिंगचं प्रमाण वाढलं असेल तर नेहमीच विकतचे स्क्रब किंवा फेसमास्क लावण्याऐवजी चेहऱ्याला पुढे सांगितलेले काही घरगुती स्क्रब लावून पाहा. त्वचेवर छान ग्लो येईल. 2 / 6त्यापैकी पहिला आहे पपई स्क्रब. यासाठी थोडी पपई घ्या आणि ती मॅश करा. त्यामध्ये १ चमचा मध आणि १ चमचा कॉफी पावडर मिसळा. हा लेप चेहऱ्याला लावा आणि मसाज करा. त्यानंतर १० मिनिटांनी चेहरा धुवून टाका. त्वचेमध्ये छान फरक दिसून येईल.3 / 6दुसरं आहे केळीचं स्क्रब. केळी देखील त्वचेेसाठी अतिशय उपयुक्त ठरते. केळीचा स्क्रब तयार करण्यासाठी पिकलेलं केळ घेऊन ते मॅश करा. त्यामध्ये १ चमचा साखर घालून ते चेहऱ्याला लावा आणि हलक्या हाताने मालिश करा. डेडस्किन, टॅनिंग जाऊन त्वचेवर छान चमक येईल. 4 / 6चिंचेचा कोळ, दही आणि मध हा स्क्रब चेहऱ्याला नियमितपणे लावल्यास पिगमेंटेशन कमी होण्यास मदत होते.5 / 6संत्रीच्या फोडीवर थोडी पिठीसाखर घालून ती फोड चेहऱ्यावर चोळा. यामुळेही त्वचा स्वच्छ होण्यास मदत होईल.6 / 6काकडीच्या फोडीवर चिमूटभर हळद, थोडंसं बेसन आणि चमचाभर मध घाला आणि ती फोड चेहऱ्यावर चोळा. त्वचा मऊ, हायड्रेटेड आणि स्वच्छ होईल.