Join us

Skin Care: हिवाळ्यासाठी घरीच तयार करा नाईट क्रिम, थंडीत त्वचा कोरडी होणारच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2025 14:51 IST

1 / 7
पावसाचा जोर ओसरल्याने आता वातावरणात थोडी थंडी जाणवायला लागली आहे. त्वचा थोडीशी कोरडी पडायलाही सुरुवात झाली आहे.
2 / 7
हिवाळ्याच्या दिवसांत त्वचेची थोडी जास्त काळजी घ्यावी लागते. तिला व्यवस्थित मॉईश्चराईज करण्याची गरज असते. तरच त्वचा मऊ, मुलायम राहाते. म्हणूनच हिवाळ्यात नाईट क्रिम आवर्जून लावावे लागते.
3 / 7
आता महागड्या क्रिमवर पैसे खर्च करण्यापेक्षा ग्लिसरीन वापरून घरच्याघरीच नाईट क्रिम कसे तयार करायचे ते पाहा. हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये १ चमचा ग्लिसरीन घ्या. ग्लिसरीन त्वचेतलं मॉईश्चर टिकवून ठेवण्यास मदत करते.
4 / 7
यानंतर त्यामध्ये २ चमचे ॲलोव्हेरा जेल घाला. ॲलोव्हेरा जेलदेखील त्वचेसाठी अतिशय उत्तम असते. त्यामुळे त्वचा हायड्रेटेड राहण्यास मदत होते.
5 / 7
आता या मिश्रणामध्ये १ व्हिटॅमिन ई कॅप्सूल घाला. कारण व्हिटॅमिन ई त्वचेला तरुण, चमकदार ठेवण्यासाठी मदत करते.
6 / 7
जर तुमची त्वचा खूप ऑईली असेल तर या मिश्रणामध्ये १ चमचा गुलाब जल घाला. आता सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून घ्या आणि त्याचं क्रिमसारखं मिश्रण तयार झालं की ते एखाद्या एअरटाईट डबीमध्ये घालून ठेवा.
7 / 7
या पद्धतीने तयार केलेलं क्रिम ८ ते १० दिवस चांगलं टिकतं. रोज रात्री झोपण्यापुर्वी हे क्रिम लावून त्वचेला मालिश करा. सकाळी चेहरा धुवून टाका. त्वचेमध्ये खूप छान फरक दिसून येईल.
टॅग्स : ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी