1 / 11१. दिवाळी आली की आपण हमखास पार्लर गाठतो. एरवी सहज मिळणारी पार्लरची अपॉईंटमेंट त्याकाळात मात्र मोठ्या कष्टाने मिळते. कारण प्रत्येक पार्लरमध्ये गर्दीच खूप जास्त असते.2 / 11२. पण असं 'पी हळद आणि हो गोरी...', असं करण्यापेक्षा फेशियल करून आपल्याला जो ग्लो मिळणार आहे, तो जर नैसर्गिक पद्धतीने मिळविण्याचा प्रयत्न केला आणि तो ही कायम टिकणारा असेल तर ते अधिक चांगलं नाही का?3 / 11३. त्यासाठीच हे घरगुती अलमंड नाईट क्रिम तयार करा आणि रोज रात्री झोपण्यापुर्वी चेहऱ्याला लावा. बघा दिवाळीपर्यंत तुमची चेहरा उजळ, चमकदार होईल आणि त्वचेवर एक वेगळाच ग्लो येईल. घरच्याघरी बदामाचं नाईट क्रिम कसं तयार करायचं, याची माहिती इन्स्टाग्रामच्या beautywithus2022 या पेजवर शेअर करण्यात आली आहे. 4 / 11४. अलमंड नाईट क्रिम तयार करण्यासाठी ८ ते १० बदाम रात्रभर पाण्यात भिजत ठेवा.5 / 11५. सकाळी उठल्यानंतर त्याची साले काढून टाका आणि त्यात १ टेबलस्पून गुलाबजल टाकून त्याची बारीक पेस्ट तयार करून घ्या.6 / 11६. ही पेस्ट एका बाऊलमध्ये टाका. त्यात १ टेबलस्पून ॲलोव्हेरा जेल टाका. 7 / 11७. त्यानंतर त्यात ७ ते ८ केशराच्या काड्या टाका.8 / 11८. आता त्यामध्ये ४ ते ५ थेंब बदामाचे तेल टाका.9 / 11९. हे सगळे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि एका काचेच्या बाटलीत भरून ठेवा.10 / 11१०. रोज रात्री झोपण्यापुर्वी चेहरा स्वच्छ धुवून घ्या आणि हे नाईट क्रिम चेहऱ्याला लावा. क्रिम लावल्यानंतर कुठेही धुळीत जाणे टाळा.11 / 11 ११. सकाळी उठल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून टाका. हा प्रयोग नियमित केल्यास ८ ते १० दिवसांतच त्वचेवर छान चमक येईल.