1 / 8त्वचेवर जर खूप पिगमेंटेशन, डार्क स्पॉट्स झाले असतील तर पुढे सांगितलेला एक घरगुती उपाय तुम्हाला नक्कीच खूप फायदेशीर ठरू शकतो.2 / 8किंवा ज्यांना नेहमीच पिंपल्सचा त्रास होतो, चेहऱ्यावर ॲक्ने आहेत, त्यांचाही त्रास जायफळाचं क्रिम लावल्याने कमी होऊ शकतो.3 / 8जायफळ त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरतं. एजिंग प्रोसेस स्लो करून त्वचा नितळ, स्वच्छ करण्यासाठी जायफळाची मदत होते. म्हणूनच आता त्वचेसाठी अतिशय गुणकारी ठरणारं आणि त्वचेवर ग्लो आणणारं जायफळाचं क्रिम घरच्याघरी कसं करायचं ते पाहूया. 4 / 8यासाठी एका वाटीमध्ये ३ ते ४ चिमूट जायफळाची पावडर घ्या.5 / 8यामध्ये १ चमचा कस्तुरी हळद टाका. यातील ॲण्टीबॅक्टेरियल, ॲण्टीफंगल गुणधर्म त्वचेसाठी फायदेशीर ठरतात.6 / 8यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा खोबरेल तेल आणि ८ ते १० थेंब ग्लिसरीन घाला. त्वचा हायड्रेटेड ठेवण्यासाठी हे दोन्ही पदार्थ चांगले आहेत.7 / 8त्यानंतर सगळ्यात शेवटी त्यामध्ये २ ते ३ चमचे ॲलोव्हेरो जेल घाला. सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि एका एअरटाईट डबीमध्ये भरून ठेवा.8 / 8रोज रात्री झोपण्यापुर्वी त्वचेला हे क्रिम लावून २ ते ३ मिनिटे मसाज करा. दुसऱ्यादिवशी सकाळी चेहरा धुवा. काही दिवस नियमितपणे वापरल्यास त्वचेमध्ये खूप छान बदल दिसून येईल.