Join us
Daily Top 2 Weekly Top 5

आठवड्यातून २ वेळा चेहऱ्याला लावा 'हा' लेप, सुरकुत्या न येता पन्नाशीतही त्वचा राहील टाईट, सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2026 14:09 IST

1 / 8
हल्ली प्रदुषण, ऊन, धूळ या सगळ्यामुळे त्वचेच्या कित्येक तक्रारी कमी वयातच सुरू झालेल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे त्वचेला कमी वयातच सुरकुत्या येणे.
2 / 8
अगदी तिशीच्या आतच्या महिलांच्याही डोळ्यांच्या भोवती बारीक सुरकुत्या दिसू लागतात. हे टाळायचं असेल तर आठवड्यातून फक्त २ वेळा हा एक घरगुती उपाय करा. यामुळे त्वचेचा टाईटनेस वाढतो आणि त्वचा छान चमकदार, तरुण राहण्यास मदत होते.
3 / 8
हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये २ टीस्पून तांदळाचं पीठ घ्या. तांदळाच्या पिठामुळे त्वचेला छान पोषण मिळतं. तसेच टॅनिंग, डेडस्किन निघून जाण्यास मदत होते.
4 / 8
त्यानंतर त्यामध्ये १ टीस्पून कॉफी पावडर घाला. कॉफीमध्ये असणारे गुणधर्म त्वचा चमकदार राहण्यासाठी मदत करतात.
5 / 8
त्वचा चमकदार आणि मऊ राहण्यासाठी दही अतिशय उपयुक्त ठरतं. त्यामुळे या फेसपॅकसाठी आपल्याला १ टीस्पून दहीदेखील घ्यायचं आहे.
6 / 8
तसेच त्यामध्ये १ चमचा कोरफडीचा ताजा गर घाला. त्वचा रिपेअर करण्याचं काम कोरफड करते.
7 / 8
सगळ्यात शेवटी त्यामध्ये १ व्हिटॅमिन ई कॅप्सूल घाला. त्वचेला छान पोषण मिळतं. त्वचा हायड्रेटेड राहते आणि त्यामुळे फाईन लाईन्स कमी होण्यास मदत होते.
8 / 8
हा लेप चेहऱ्याला लावा आणि १५ मिनिटांनी हलक्या हाताने मालिश करून चेहरा धुवून टाका. यानंतर त्वचेला मॉईश्चरायझर लावा. त्वचेमध्ये खूप छान बदल दिसून येईल.
टॅग्स : ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी