1 / 8आपल्या स्वयंपाक घरातलेच पदार्थ वापरून त्वचेच्या कित्येक समस्या अगदी सहज सोडवता येतात. त्यासाठी मग इतर कोणत्याही विकतच्या महागड्या क्रिमची, साबणची गरज पडत नाही.. ते उपाय कोणते आणि कसे करायचे ते पाहा.. 2 / 8चेहऱ्यावर जर पिगमेंटेशन असतील तर दही आणि ज्येष्ठमधाची पावडर एकत्र करून डागांवर लावा. १० मिनिटांनी चेहरा धुवून मॉईश्चराईज करा. हा उपाय आठवड्यातून दोन वेळा करा. खूप चांगला फरक दिसून येईल.3 / 8जर डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळं खूप वाढली असतील बटाट्याचा रस रोज काही मिनिटांसाठी डोळ्यांभोवती लावा. डार्क सर्कल्स हळूहळू कमी होतील.4 / 8जर चेहऱ्यावर कमी वयातच सुरकुत्या दिसायला लागल्या असतील तर ग्लिसरीन आणि गुलाबजल हे दोन्ही पदार्थ एकत्र करून चेहऱ्याला लावा.5 / 8ॲक्नेमुळे चेहरा खूपच खराब दिसायला लागला असेल तर त्यावर लवकर उपाय करणं गरजेचं आहे. यासाठी टी ट्री ऑईल आणि ॲलोव्हेरा जेल एकत्र करून त्वचेला मालिश करा. चांगला बदल दिसून येईल.6 / 8त्वचेवर जर खूप टॅनिंग होऊन ती काळवंडली असेल तर बेसन, दही आणि तांदळाचं पीठ यांचा लेप चेहऱ्याला लावून मालिश करा. नंतर १० मिनिटांनी हळूवारपणे चोळून चेहरा धुवून टाका. त्वचा उजळेल. 7 / 8थंडीमुळे त्वचा खूप कोरडी पडली असेल तर दही आणि साय एकत्र करून त्वचेवर लावा आणि मालिश करा. त्वचेचा कोरडेपणा कमी होईल.8 / 8नाकावर, ओठांजवळ ब्लॅकहेड्स दिसायला लागले असतील तर तांदळाच्या पिठामध्ये थोडी ज्येष्ठमध पावडर आणि थोडं ग्लिसरीन मिसळून ते लावा. ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स कमी होतील.