Join us
Daily Top 2 Weekly Top 5

थंडीमुळे त्वचा कोरडी, भुरकट दिसतेय? रात्री झोपताना किचनमधले ४ पदार्थ लावा- त्वचा मऊ, चमकदार होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2025 14:47 IST

1 / 6
सध्या थंडीचा कडाका प्रचंड वाढलेला आहे. त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर होतो आणि त्वचा कोरडी, रखरखीत होते.(home hacks for dry skin)
2 / 6
त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी आपल्या स्वयंपाक घरातले काही पदार्थ निश्चितच मदत करू शकतात (winter special skin care tips). त्या पदार्थांपैकी एखादा पदार्थ जरी तुम्ही रात्री झोपण्यापुर्वी चेहऱ्याला लावला तरी त्वचेमध्ये खूप छान बदल दिसू शकतो.(4 ingredients for soft skin in winter)
3 / 6
त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी साय खूप फायदेशीर ठरते. रोज रात्री झोपण्यापुर्वी दुधावरची थोडी ताजी साय घेऊन त्वचेला मालिश करा. यानंतर बाहेर धुळीत जाणे टाळा. दुसऱ्यादिवशी त्वचा अगदी मऊ झालेली दिसेल.
4 / 6
कच्चं दूध देखील त्वचा मऊ, कोमल करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतं. यासाठी कच्चं दूध २ ते ३ तास तसंच ठेवा. त्यानंतर त्यावर जो वरचा दाट थर जमा होतो तो अलगद काढा आणि त्याने त्वचेला मालिश करा.
5 / 6
दह्यामध्ये असणारं लॅक्टीक ॲसिड त्वचेचा कोरडेपणा कमी करतं. त्यामुळे दह्याने चेहऱ्याला मालिश करा. १० मिनिटांनी चेहरा धुवून टाका. त्वचेमध्ये छान बदल दिसून येईल.
6 / 6
तुपामध्ये असणारे फॅट्स त्वचेसाठी खूप पोषक ठरतात. त्यामुळे साजूक तुपाचे ४- ५ थेंब हातावर घ्या आणि त्वचेला मालिश करा. तुम्हाला इतर कोणत्याच मॉईश्चरायजरची गरज पडणार नाही.
टॅग्स : ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडीहिवाळाथंडीत त्वचेची काळजी