Join us
Daily Top 2 Weekly Top 5

छोट्या केसांसाठी ९ सुंदर हेअरस्टाईल, साडी नेसली की करा झटपट केशरचना-दिसाल सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 18:38 IST

1 / 9
केस लहान असले तरी तुम्ही साडीवर अतिशय स्टायलिश आणि ग्रेसफुल दिसू शकता. लहान केसांसाठी साडीवर शोभून दिसतील अशा काही उत्तम हेअरस्टाईल्स पाहूया. (Hairstyle For Short Hairs On Saree)
2 / 9
केसांना एक बाजूनं भांग पाडून एका बाजूचे केस कानामागे पिन करा. ही सर्वात सोपी आणि क्लासी हेअरस्टाईल आहे जी सिल्क किंवा कॉटन साडीवर खूपच छान दिसते.
3 / 9
जर तुमचे केस बॉब कट असतील तर हलके कर्ल्स करून त्यांना थोडा मेसी लूक द्या. यामुळे केसांना व्हॉल्यूम मिळतो .
4 / 9
समोरचे थोडे केस घेऊन मागे पिन करा आणि मागचे केस मोकळे सोडा. यामुळे चेहरा उठून दिसतो आणि कपाळावर केस येत नाही.
5 / 9
लहान केसांवर एखादं मोठं फुल किंवा गजरा पिन केल्यास साडीवर खूपच उठून दिसाल. यामुळे पारंपारीक लूक पूर्ण होईल.
6 / 9
समोरच्या केसांना थोडा पफ द्या किंवा व्हेव्हज तयार करा. यामुळे उंची जास्त वाटते आणि लहान केस असूनही एक रॉयल लूक मिळतो.
7 / 9
समोरच्या बाजूनं केसांच्या दोन बटा घेऊन त्यांना ट्विस्ट करा आणि मागे पिन करा. ही हेअरस्टाईल दिसायला नाजूक वाटते.
8 / 9
हल्ली मोत्यांचे किंवा कुंदरने हेडबॅण्ड फॅशनमध्ये आहेत. साडीच्या रंगाशी जुळणारे स्टायलिश पिन्स किंवा क्लिप्स वापरून तुम्ही केसांना हटके लूक देऊ शकता.
9 / 9
लहान केसांचे शेंडे बाहेरच्या बाजूला वळवा. ही हेअरस्टाईल साडीवर खूपच स्मार्ट लूक देते.
टॅग्स : ब्यूटी टिप्सकेसांची काळजी