1 / 7केस कलर करताना चेहऱ्याला लागलेले डाग काढून टाकण्यासाठी तुम्ही काही सोपे घरगुती उपाय करू शकता. (Hair Dye Color Stains On Face This Simple Skin Care To Remove Them)2 / 7डाग पडलेल्या जागी थोडं नारळ तेल लावा आणि हलक्या हातानं मसाज करा. काही वेळानंतर कापसानं पुसून घ्या. तेल त्वचेतील रंग विरघळवण्यास मदत करते.3 / 7लिंबू नैसर्गिक ब्लिचिंग एजंट आहे. लिंबाच्या रसात थोडं मध मिसळून डागांवर लावा आणि ५ ते १० मिनिटांनी कोमट पाण्यानं धुवून घ्या.4 / 7पांढऱ्या रंगाची साधी टुथपेस्ट डागांवर लावा. ती थोडी सुकली की ओल्या कापडानं घासून घ्या. टुथपेस्टमध्ये असलेले घट्क रंगाचे कण काढून टाकण्यास प्रभावी ठरतात.5 / 7डाग असलेल्या भागांवर व्हॅसलीन लावून रात्रभर राहू द्या किंवा काही तास ठेवा. त्यानंतर कापसानं पुसून घ्या. त्यामुळेत्वचा कोरडी न पडता डाग निघण्यास मदत होते.6 / 7जर डाग ताजे असतील तर ऑईल बेस्ड मेकअप रिमुव्हर वापरल्यानं ते लगेच निघून जातात.7 / 7डाग काढताना त्वचा खूप जोरात घासू नका. अन्यथा त्वचेला इजा होऊ शकते. र कलर करण्यापूर्वी कपाळाच्या आणि कानाच्या कडेला व्हॅसलीन किंवा तेल लावा जेणेकरून रंग त्वचेला चिकटणार नाही.