नवा ट्रेंड! स्किन केअरसाठी 'हे' खास ड्रिंक पीत आहेत Gen-Z; पण खरंच किती होतो फायदा?

Updated:December 11, 2025 18:39 IST2025-12-11T18:29:27+5:302025-12-11T18:39:34+5:30

Gen-Z स्किन केअरसाठी कोणते ड्रिंक्स पीत आहेत, ते जाणून घेऊया...

नवा ट्रेंड! स्किन केअरसाठी 'हे' खास ड्रिंक पीत आहेत Gen-Z; पण खरंच किती होतो फायदा?

आजकाल सोशल मीडियावर विविध प्रकारचे स्किनकेअर ड्रिंक्स वेगाने व्हायरल होत आहेत. कुठे 'ग्लोइंग स्किन ड्रिंक' सांगितलं जातं, तर कुठे 'पिंपल-फ्री' किंवा 'ग्लास स्किन'साठी नवीन ज्यूस ट्रेंड करत आहे. लोक मोठ्या उत्साहाने हे ट्रेंडी व्हिडिओ फॉलो करत आहेत. Gen-Z स्किन केअरसाठी कोणते ड्रिंक्स पीत आहेत, ते जाणून घेऊया...

नवा ट्रेंड! स्किन केअरसाठी 'हे' खास ड्रिंक पीत आहेत Gen-Z; पण खरंच किती होतो फायदा?

Pinterest च्या अहवालानुसार, स्किनकेअर ड्रिंक्सशी संबंधित सर्चमध्ये १७६ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. म्हणजेच आता लोक सीरम, क्रीम आणि मास्कच्या पलीकडे जाऊन थेट ज्यूस आणि शॉट्सद्वारे ग्लो मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. हा ट्रेंड खूप वेगाने वाढत आहे.

नवा ट्रेंड! स्किन केअरसाठी 'हे' खास ड्रिंक पीत आहेत Gen-Z; पण खरंच किती होतो फायदा?

सोशल मीडियावर 'रेटिनॉल शॉट्स', 'ग्लोई ग्रीन ज्यूस' आणि लिंबू-ऑलिव्ह ऑईल असलेल्या ड्रिंक्सच्या रेसिपी मोठ्या प्रमाणावर शेअर केल्या जात आहेत. हे ड्रिंक्स पिऊन त्वचा स्वच्छ आणि चमकदार होऊ शकते, असा दावा केला जातो. याच कारणामुळे लाखो लोक ते ट्राय करत आहेत.

नवा ट्रेंड! स्किन केअरसाठी 'हे' खास ड्रिंक पीत आहेत Gen-Z; पण खरंच किती होतो फायदा?

अमेरिकन न्यूट्रिशनिस्ट लूसिया स्टान्सबी यांचं म्हणणं आहे की, बहुतेक व्हायरल रेसिपीमध्ये गाजर वापरलं जाते, कारण लोक त्याला 'रेटिनॉलचा सोर्स' मानतात. परंतु, गाजर रेटिनॉल देत नाही. त्यात असलेले 'बीटा-कॅरोटीन' अगदी कमी प्रमाणातच व्हिटॅमिन-ए मध्ये रूपांतरित होतं.

नवा ट्रेंड! स्किन केअरसाठी 'हे' खास ड्रिंक पीत आहेत Gen-Z; पण खरंच किती होतो फायदा?

लूसिया यांच्या मते, गाजराचा ज्यूस बनवताना त्याचे फायबर आणि अनेक आवश्यक पोषक तत्वे कमी होतात. त्यामुळे, लांबलचक रेसिपी बनवून ज्यूस पिण्याऐवजी गाजर थेट कापून खाणं शरीरासाठी अधिक फायदेशीर ठरतं.

नवा ट्रेंड! स्किन केअरसाठी 'हे' खास ड्रिंक पीत आहेत Gen-Z; पण खरंच किती होतो फायदा?

एका एक्सपर्टने सांगितले आहे की, फक्त ज्यूस पिण्याने त्वचेत जादुई सुधारणा होत नाही. चांगला आहार, पुरेशी झोप, योग्य प्रमाणात पाणी आणि थोडाफार व्यायाम हे सर्व मिळून त्वचेला निरोगी बनवतात.

नवा ट्रेंड! स्किन केअरसाठी 'हे' खास ड्रिंक पीत आहेत Gen-Z; पण खरंच किती होतो फायदा?

लूसिया यांचा सल्ला आहे की, अन्नाला स्किन ट्रीटमेंटसारखं समजू नये. अन्न शरीराला पोषण देते, परंतु त्वचेच्या प्रत्येक समस्येवर एकट्याने उपचार करू शकत नाही. त्यामुळे, व्हायरल ट्रेंड्स स्वीकारण्यापूर्वी योग्य माहिती आणि विचार करणं आवश्यक आहे.