कलर विसरा, डाय विसरा ‘हा’ नॅचरल उपाय करतो केस काळे आणि मऊ, साइड इफेक्ट्स नाहीत..
Updated:April 29, 2025 15:12 IST2025-04-29T15:07:48+5:302025-04-29T15:12:01+5:30
Forget color, forget dye, this natural remedy makes hair black : केसांच्या नैसर्गिक काळ्या रंगासाठी घरगुती उपाय. पाहा काय कराल.

पांढरे केस म्हणजे म्हातारपणाचे लक्षण असे म्हटले जाते. मात्र आजकाल वयाच्या आधीच केस पिकायला सुरवात होते. अगदी वीशीतील मुला-मुलींचे केसही पिकलेले असतात. एक जरी केस पिकला की मग इतरही पिकत जातात.
वेळेआधी केस पिकण्यामागे अनेक कारणे असू शकतात. प्रदूषण, रहाणीमान, आहार, सवयी तसेच इतरही काही मेडीकल कंडिशन्स असू शकतात.
पांढरे झालेले केस मग आपण रंगवतो. असे अगदीच क्वचित लोक असतील ज्यांना पिकलेल्या केसांचा फरक पडत नाही. बाकी लोक त्याचा भरपूर विचार करतात. स्ट्रेस घेतात. केस रंगवल्याने केस गळतातही केस कमकुवतही होतात.
काही घरगुती उपाय आहेत जे केल्याने केस पिकणे बंद होईल. मात्र नियमितपणे काही नियम तसेच सवयी पाळणे गरजेचे आहे. दोन दिवसामध्ये फरक जाणवून येणार नाही. त्यासाठी नेमाने उपाय करावे लागतील.
कडीपत्ता व मेथी हे मिश्रण केसांसाठी कमालीचे फायदेशीर ठरते. नारळाच्या तेलामध्ये कडीपत्ता व मेथी उकळून घ्या. ते तेल नेमाने केसांना लावा. आठवड्यातून दोनदा तरी लावायला हवे. केस मजबूतही होतील तसेच काळेही दिसतील.
केसांसाठी आवळा पावडर वापरणे गरजेचे आहे. पाण्यामध्ये किंवा तेलामध्ये मिसळून ही पूड केसांना लावायची. आवळ्यामध्ये जीवनसत्त्व 'सी' तसेच अँण्टी ऑक्सिडंट्स असतात. केसांसाठी ते उपयुक्त असतात.
चहा तर घरी केला जातोच. चहाचा पूड केसांसाठी औषधी असते. पाण्यामध्ये चहा पूड उकळायची. ती छान गाळून घ्यायची. न्हाऊन झाल्यावर शेवटी ते पाणी केसांवर ओतायचे. आणि मग नुसत्या पाण्याचे धुऊन टाकायचे.
केस वयाआधी पिकण्यामागे महत्वाचे कारण म्हणजे जीवनसत्त्व 'बी१२'चा अभाव. तसेच प्रोटीन, आयर्न, आदी सत्वाची कमतरता असल्यावर केस पिकतात. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेऊन ते घटक वाढवण्यासाठी प्रयत्न करा.