1 / 6रात्री झोपण्यापुर्वी त्वचेची योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. कारण तुमचं नाईट केअर रुटीन व्यवस्थित असेल तर त्याचा त्वचेवर नक्कीच चांगला परिणाम दिसून येतो. 2 / 6पण नाईट केअर रुटीनच्या नावाखाली त्वचेवर नको त्या गोष्टींचा मारा करणं मात्र टाळायला हवं. नाहीतर त्वचेवर पिंपल्स, ब्रेकआऊट्स, ॲक्ने वाढू शकतात.(don't apply 5 things on your face as a night skin care routine)3 / 6खोबरेल तेल त्वचेसाठी चांगलेच आहे. पण बाराही महिने ते रात्री झोपण्यापुर्वी चेहऱ्याला लावणं टाळायला हवं. कारण प्रत्येक स्किन टाईपला ते सहन होईलच असं नाही. अन्यथा त्वचेवरचे ब्रेकआऊट्स वाढू शकतात.(avoid 5 things as a night skin care routine)4 / 6तेच साजुक तुपाचंही आहे. साजुक तुप अधून मधून चेहऱ्याला लावून मालिश करायला हरकत नाही. पण रोज रात्री तूप लावून चेहऱ्याला मालिश करणं त्वचेसाठी त्रासदायक ठरू शकतं.5 / 6लिंबाच्या रसाचा जास्त वापर असणारं कोणतंही होममेड क्रिम रात्री चेहऱ्याला लावून झोपू नका. कारण लिंबाचा रस जास्त वेळ त्वचेवर राहिला तर त्याने त्वचेला त्रास होऊ शकतो.6 / 6चेहऱ्यावर पिंपल्स असतील तर काही जणी त्या पिंपल्सवर टुथपेस्ट लावतात आणि तसंच झोपून जातात. टुथपेस्टमुळे पिंपल्स लवकर कोरडे पडतात आणि दबतात असं म्हणतात. पण सलग ८ ते ९ तास तुमच्या त्वचेवर टुथपेस्ट राहाणं चांगलं नाही. यामुळे जळजळ, खाज येणे, त्वचा काळी पडणे असे त्रास होऊ शकतात.