चेहरा भप्प जाडजूड दिसतो? चेहऱ्यावरची चरबी घटवण्याचे पाहा ६ सोपे उपाय, डबल चीन गायब

Updated:April 6, 2025 15:50 IST2025-04-06T15:44:05+5:302025-04-06T15:50:37+5:30

Does your face look too fat? See 6 easy ways to reduce facial fat : चेहऱ्यावरील चरबी करा झटकन कमी. घर बसल्या करा हे सोपे व्यायाम.

चेहरा भप्प जाडजूड दिसतो? चेहऱ्यावरची चरबी घटवण्याचे पाहा ६ सोपे उपाय, डबल चीन गायब

काही जणांच्या शरीरावरील चरबीचे प्रमाण आटोक्यात असते. मात्र चेहऱ्यावर भरपूर फॅट्स असतात. गालाजवळ, खास करून हनुवटीजवळ भरपूर चरबी असते. दिसताना ते जरा फुगलेले दिसते.

चेहरा भप्प जाडजूड दिसतो? चेहऱ्यावरची चरबी घटवण्याचे पाहा ६ सोपे उपाय, डबल चीन गायब

शरीरावरील चरबी कमी करण्यासाठी आपण विविध व्यायाम करतो. मात्र त्या व्यायामांमुळे चेहऱ्यावरील चरबी कमी होत नाही. फेस फॅट्स कमी करण्यासाठी इतर काही पर्याय असतात ते करावे लागतात.

चेहरा भप्प जाडजूड दिसतो? चेहऱ्यावरची चरबी घटवण्याचे पाहा ६ सोपे उपाय, डबल चीन गायब

काही पेये असतील किंवा मग काही व्यायाम असतील हे व्यायाम तुम्ही बसल्याबसल्याही करू शकता. दिवसातून दोनदा जरी केलेत तरी महिन्याभरामध्ये चेहर्‍याच्या आकारामध्ये फरक जाणवायला लागेल.

चेहरा भप्प जाडजूड दिसतो? चेहऱ्यावरची चरबी घटवण्याचे पाहा ६ सोपे उपाय, डबल चीन गायब

चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी चिन लिफ्ट हा व्यायाम करा. वरच्या दिशेने तोंड करायचे. हनुवटीवरील त्वचा वर ओढायचा प्रयत्न करायचा मानेवर ताण द्यायचा.

चेहरा भप्प जाडजूड दिसतो? चेहऱ्यावरची चरबी घटवण्याचे पाहा ६ सोपे उपाय, डबल चीन गायब

फीश फेस हा व्यायाम दिवसातून कितीही वेळा करता येतो. दोन्ही गाल आत ओढायचे माश्याप्रमाणे चेहरा करायचा. गालाची वाढलेली चरबी कमी होते.

चेहरा भप्प जाडजूड दिसतो? चेहऱ्यावरची चरबी घटवण्याचे पाहा ६ सोपे उपाय, डबल चीन गायब

जबड्याचे व्यायाम करायचे. हनुवटीवरील चरबी झटपट कमी होते. जबड्याची खालची बाजू चेहर्‍यापासून लांब नेण्याचा प्रयत्न करायचा. हनुवटी पुढच्या दिशेने ओढायचा प्रयत्न करा. बसल्याबसल्या काम करत हे व्यायाम करता येतात.

चेहरा भप्प जाडजूड दिसतो? चेहऱ्यावरची चरबी घटवण्याचे पाहा ६ सोपे उपाय, डबल चीन गायब

पपेट फेस हा फारच सोपा प्रकार आहे. काही करायचे नाही फक्त ओठ अगदी बाहेर करून हसायचे. जेवढा जोर लावता येईल तेवढा लावा. अगदी मोठी स्माईल करायची. गालावरची चरबी लवकर कमी होते.

चेहरा भप्प जाडजूड दिसतो? चेहऱ्यावरची चरबी घटवण्याचे पाहा ६ सोपे उपाय, डबल चीन गायब

ओठांचा गोल करायचा. त्यावर जोर द्यायचा. पुन्हा चेहरा पूर्ववत करायचा आणि मग पुन्हा ओठ गोल करायचे. बाहेर फुंकर मारायची. याला ब्लोविंग एअर असे म्हणतात. ओठांजवळचा फुगीरपणा कमी करण्यासाठी मदत होते.

चेहरा भप्प जाडजूड दिसतो? चेहऱ्यावरची चरबी घटवण्याचे पाहा ६ सोपे उपाय, डबल चीन गायब

फेशिअल मसाज रोज झोपण्यापूर्वी व उठल्यानंतर करायचा. हाताच्या बोटांनी चेहरा चोळा. तुम्हाला जसा जमेल तसा मसाज करा. फार काही वेगळं करायची गरज नाही. साधा पाच मिनिटांचा मसाज पुरेसा असतो.