By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 00:39 IST
1 / 8केस गळणं, केसांमध्ये कोंडा होणं, केस कोरडे पडणं या सध्याच्या स्थितीत उद्भवणाऱ्या खूपच कॉमन समस्या आहेत. बऱ्याच महिला केस धुतल्यानंतर केसांना जाड टॉवेल गुंडाळून ठेवतात. डॉक्टर सांगतात केसांना जाड टॉवेल गुंडाळणं नुकसानकारक ठरू शकतं कारण ओल्या टॉवेलमुळे अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. (How To Take Care Of Hairs)2 / 8 डॉक्टर सांगतात की केस धुतल्यानंतर जाड टॉवेलनं केस सुकवण्यासाठी ते जाड टॉवेलनं गुंडाळून ठेवल्यास केसाचं नुकसान होऊ शकतं. जाड टॉवेलनं केस वर बांधल्यामुळे तुमची हेअर लाईन मागे सरकू शकते आणि पुढच्या बाजूला केस जास्त विरळ दिसू शकतात. (Hair Care Tips)3 / 8त्याऐवजी तुम्ही हेअर ड्रायर वापरू शकता ज्यामुळे केस लवकर सुकतील आणि स्काल्प हेल्दी राहील. आठवड्यातून २ ते ३ वेळाच केसांवर शॅम्पूचा वापर करा. जर तुमचे केस मोठे असतील तर जास्तवेळा धुतल्यानं केस खराब होऊ शकतात.4 / 8ओले केस टॉवेलनं बराचवेळ गुंडाळून ठेवल्यामुळे केसांमध्ये कोंडा होण्याची समस्या उद्भवते.5 / 8हेअर वॉशनंतर टॉवेल केसांना लपटून ठेवल्यामुळे स्काल्पमध्ये फंगल इन्फेक्शन वाढते ज्यामुळे केसाचं नुकसान होऊ शकतं.6 / 8 ज्या लोकांना हेअर फॉलसारख्या समस्या उद्भवत आहेत त्यांनी केसांना ओला टॉवेल गुंडाळून ठेवण्याची चूक करू नये. कारण यामुळे समस्या अधिक वाढू शकते.7 / 8जर तुम्ही केसांवर ड्रायर फिरवत असाल तर ते नेहमी फिरवू नका. ज्यामुळे केस डॅमेज होऊ शकतात.8 / 8ओले केस विंचरणं टाळा. केस ८० टक्के सुकल्यानंतरच विंचरा. अन्यथा केस जास्त खराब होऊ शकतात.